खा.सुळे आज इंदापूर दौऱ्यावर, व्यापारी-डॉक्टरांसह महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा घेणार मेळावा
आय मिरर(देवा राखुंडे)
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे आज मंगळवारी दि.१६ रोजी इंदापूर तालुक्याचा दौरा करणार आहेत. तालुक्यातील सणसर,लासुर्णे अंथुर्णे येथे सांत्वनपर भेटि देऊ त्या इंदापूर शहरातील शासकीय विश्रामगृहात व्यापारी, डॉक्टर मंडळींसह महाविकास आघाडी कार्यकर्ता मेळावा घेणार असून बुथ कमिटीची बैठक घेणार आहेत.
एकूणचं मतदार संघात लोकसभेचे पडघम वाजू लागले असून अगदी काही दिवसात कोणत्याही क्षणी लोकसभेच्या निवडणूका जाहिर होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. जिल्हा स्तरावर प्रत्येक पक्षाकडून कार्यकर्ता मेळावे ही घेतले जात आहेत. इंदापूर विधानसभा हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी झाल्यावर अजित पवारांचा राष्ट्रवादीचा गट भाजप सेने सोबत सरकारमध्ये सहभागी झाला. मात्तब्बर नेते समजले जाणारे दत्तात्रय भरणे आणि प्रदीप गारटकर यांनी पवार सुळेंची साथ सोडत अजित दादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.यामुळे इंदापूर विधानसभा मतदार संघात आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी सुप्रिया सुळेंना मोठे कसब करावे लागणार आहे.
व्यापारी डॉक्टरांसह पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात कोणतं आव्हान करणार?
दरम्यान मोदींना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी अजित पवार यांनी भाजपा आणि शिवसेने सोबत जाण्याचा निर्णय घेतला, मोदींना पाठिंबा दर्शवला. त्यामुळे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी अजित पवार लोकसभेला जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने एकजुटीने निवडून आणायचं आहे त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कामाला लागा अशा थेट सूचनाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी जाहीर सभेत दिल्या आहेत त्यामुळे आजच्या दौऱ्यात खासदार सुप्रिया सुळे शहरातील व्यापारी डॉक्टरांसह पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात कोणतं आव्हान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
भूमिपूजनाच्या नामफलकावरून सुळे खडेबोल सुनावणार ?
तर दुसरीकडे 12 जानेवारी रोजी इंदापूर शहरात शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी भूमिपूजनाच्या शिलालेखावर खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न टाकल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा गट आक्रमक झाला. या नाम फलकावरून खूप मोठा गोंधळ झाल्याचा पाहायला मिळालं. नजरचुकीने हे नाव राहिला असल्याचं आमदार दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं, तर हा शासकीय कार्यक्रम नव्हता खाजगी होता म्हणतं अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत या सर्व राड्यावरून खासदार सुप्रिया सुळे काय खडे बोल सुनावणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
What's Your Reaction?