आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ! बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील तिसरा आरोपी वालचंदनगर पोलिसांनी घेतला ताब्यात

आय मिरर
मागील सहा महिन्यांपूर्वी सासवड शेजारील बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार झाला होता आणि या प्रकरणातील तिसरा आरोपी इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिसांनी दीड तासापूर्वी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
संबंधित आरोपीला वालचंदनगर पोलिसांनी अकलूज मधून ताब्यात घेतल आहे आणि थोड्याच वेळात वालचंदनगर पोलीस या आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत.बापू उर्फ दशरथ गोसावी असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे आणि वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे.
दि. 3 ऑक्टोबर रोजी मित्राबरोबर बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना रात्री घडली होती.
बोपदेव घाटात गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास फिरण्यासाठी गेलेल्या टेबल पाॅईंट परिसरात रात्री तरुणी आणि तिचा मित्र यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यावेळी 3 आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवला. तरूणाला मारहाण केली, त्याचा शर्ट काढला. शर्टने तरूणाचे हात बांधले, त्याच्याच पॅन्टचा पट्टा काढून त्याचे पाय बांधले. तरुणाला एका झाडाला बांधून आरोपींनी परराज्यातून पुण्यात शिकायला आलेलल्या त्या 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल वानकर, पोलीस कॉन्स्टेबल कळसकर, हवालदार चालक पोलीस हवालदार गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
What's Your Reaction?






