बिग ब्रेकिंग | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती चिंताजनक
आय मिरर
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे.त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.सोनिया गांधी,प्रियंका गांधी या एम्स रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.
मनमोहन सिंग यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असून त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार कामी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.उद्या होणारी बेळगांव मधील काँग्रेसची रॅली देखील रद्द करण्यात आली असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी,मल्लिकार्जून खर्गे दिल्लीला रवाना झाले आहेत.
What's Your Reaction?