लाखेवाडीच्या जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील खेळाडूंची ऍथलेटिक्स व कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी

आय मिरर
युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार तसेच राष्ट्रीय खेळ संवर्धन संस्थेची मान्यता असलेल्या स्टेअर्स फाउंडेशनच्या यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय पातळी वरील दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवर पार पडलेल्या ॲथलेटिक्स /कबड्डी स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल तसेच विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत घवघवीत यश मिळवले.
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी सर्व राज्यातील जवळपास 4000 खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून त्यामध्ये,महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल तसेच विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लाखेवाडी च्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.
आठ वर्षे वयोगटात मुलींमध्ये 50 /100 मीटर धावणे स्पर्धेत कु. स्वरा डोंगरे या विद्यार्थिनीने सिल्वर मेडलची कमाई केली.तर दहा वर्ष वयोगटात 50 मीटर रनिंग मध्ये कुमारी आराध्या खेडकर हिने ब्रॉंझ मेडलची कमाई केली.
भालाफेक 19 वर्ष वयोगटात मुलांमध्ये कु.क्षितज जगताप ब्रॉंझ मेडल तर 19 वर्ष वयोगटात 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत मुलांमध्ये कु.अंकित मोहिते सिल्व्हर मेडल ची कमाई केली. 17 वर्ष वयोगटात कबड्डी स्पर्धेत कु.प्रतीक जाधव,कु.ऋतुराज मासाळ याने ब्रॉंझ मेडल मिळवले. तर लांब उडी मध्ये कु.पृथ्वी धनवडे याने चतुर्थ क्रमांक मिळवला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले,सचिव हर्षवर्धन खाडे,संस्थेचे मुख्य सल्लागार प्रदीप गुरव,प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर,विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडीचे गणेश पवार, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य सम्राट खेडकर यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?






