मोठी बातमी | भिगवण मध्ये पुणे सोलापूर महामार्ग ओलांडताना ट्रकने एकाला उडविले

May 23, 2025 - 18:04
May 23, 2025 - 19:18
 0  3563
मोठी बातमी | भिगवण मध्ये पुणे सोलापूर महामार्ग ओलांडताना ट्रकने एकाला उडविले

आय मिरर (निलेश मोरे)

भिगवण ग्रामपंचायत च्या हद्दीत आज दुपारी एक वाजून 30 मिनिटाच्या दरम्यान पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून दुसऱ्या बाजूला जात असताना भरधाव आलेल्या वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला जोराची धडक दिल्याने दिलीप ज्ञानदेव गायकवाड (वय ४५ वर्षे रा.कळस,ता.इंदापूर) यांचा जागीच मृत्यू झाला.

भिगवण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सागर हॉटेल समोर आपली गाडी उभा करून दिलीप गायकवाड हे महामार्ग ओलांडून दुसऱ्या बाजूला काही कारणास्तव चालले होते.त्याचवेळी भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने(एमएच १३ ए एक्स ४०५९ ) महामार्ग ओलांडणाऱ्या दिलीप गायकवाड यांना जोराची धडक दिली.

आपुलकीची सेवा ॲम्बुलन्स मधून मधून त्यांना लाईफ लाईन हॉस्पिटल या ठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

ट्रक चालक आकाश मधुकर साखरे, (वय ३२ वर्ष, रा.हिप्परगा,ता-तुळजापूर,जिल्हा- धाराशिव) याला नागरिकांनी ट्रकसह जागेवरच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे, पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे काम भिगवण पोलीस करीत आहे.

असा घडला अपघात...

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी 23 मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये अपघातातील मृत दिलीप गायकवाड यांनी हॉटेल सागर समोर आपली गाडी उभा केली. त्यानंतर गायकवाड हे महामार्ग ओलांडून दुसऱ्या बाजूला काही कारणास्तव चालले होते.त्याचवेळी पुण्याच्या बाजूकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने (एमएच १३ ए एक्स ४०५९ ) महामार्ग ओलांडणाऱ्या दिलीप गायकवाड यांना जोराची धडक दिली. या त्यांचा जागीच मृत्यू झाला.

स्थानिकांनी काढलेले बॅरिगेट्स घेताहेत अनेकांचा बळी...

इंदापूर तालुक्यातील भिगवण हे रहदारीचं महत्त्वाचं गाव आहे. याच गावातून बारामतीकडे पुण्याकडे इंदापूर कडे आणि अहिल्यानगर कडे जाणारे मार्ग असल्याने मोठी वाहतूक या ठिकाणावरून होत असते. दौंड तालुक्याच्या कर्जत तालुक्याच्या सीमारेषेवरील महत्त्वाचं गाव असल्याने आणि मोठी बाजारपेठ त्या ठिकाणी असल्याने नागरिकांची वर्दळ असते. 

दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावरील रस्ता दुभाजकावर भिगवन शहरात लोखंडी बॅरिगेट्स बसवण्यात आले होते.भरधाव वेगाने वाहणाऱ्या या महामार्गावर नियमबाह्य पद्धतीने लोकांनी रस्ता ओलांडू नये आणि अपघात होऊ नये हा त्या पाठीमागचा उद्देश होता.परंतु काही स्थानिक व्यवसायकांनी स्वतःच्या व्यवसायिक फायद्यासाठी लावलेले बॅरिगेट्स काढले असल्याची कुजबूज आता या अपघातानंतर सुरू झाली आहे. ज्या ठिकाणी रस्ता दुभाजकावरील हे बॅरिगेट्स काढले आहेत त्या ठिकाणावरून नागरिक सहजपणे रस्ता ओलांडून अलीकडे पलीकडे करू शकतात. मात्र या धोकादायक पद्धतीमुळे यापूर्वी देखील या ठिकाणी अपघात झाले आहेत तर आज दिलीप गायकवाड यांचा याच ठिकाणी अपघाती मृत्यू देखील झाला. त्यामुळे याला जबाबदार कोण ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

एन.एच.ए.आय आणि सरडेवाडी टोल प्रशासनाचे दुर्लक्ष ?

काही स्थानिक व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायिक फायद्यासाठी पुणे सोलापूर महामार्गावरील भिगवन शहरातील रस्ता दुभाजकावरील लावलेले लोखंडी बॅरिगेट्स काढले ही बाब स्पष्टपणे दिसत असताना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि सरडेवाडी टोल नाका प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं यातून स्पष्ट दिसत आहे. येरवी पुणे सोलापूर महामार्गाच्या सर्विस रोडवर साध्या चहाच्या टपरीचे जरी अतिक्रमण झालं तरी कार्य तत्परता दाखवणारं सरडेवारी टोल प्रशासन या गंभीर बाबीकडे आजपर्यंत का पाहू शकले नाही ? असा सवाल आता भिगवणकर ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय. ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणचे बेरिगेट्स वेळीच दुरुस्त केले असते तर आजचा अपघात टाळला असता आणि गायकवाड यांचे प्राण देखील वाचले असते.यापूर्वी झालेले अपघात देखील टाळता आले असते.

"भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून भिगवन शहरात पुणे सोलापूर महामार्गावरील रस्ता दुभाजकावर लोखंडी बॅरिगेट्स लावण्यात आले होते. लावलेले बॅरिगेट्स तूच तिथे ठेवण्याची जबाबदारी सरडेवाडी टोल प्रशासनाची आहे मात्र स्थानिक व्यापारी त्यांच्या व्यवसायापोटी रात्रीच्या वेळी हे बॅरिगेट्स वारंवार काढून टाकत आहेत. झालेली घटना गंभीर आहे. सरडेवाडी टोल व्यवस्थापनाकडून तातडीने या ठिकाणची पाहणी करून स्थानिक व्यापाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल" - सतीश चव्हाण, सरडेवाडी टोल व्यवस्थापक

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow