उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तरी राज्यात त्यांची ताकद नगण्य - मंत्री रामदास आठवले

Feb 25, 2025 - 07:20
Feb 25, 2025 - 08:17
 0  319
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तरी राज्यात त्यांची ताकद नगण्य - मंत्री रामदास आठवले

आय मिरर

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा एका विवाह सोहळ्या निमित्त एकत्र आले. यावरून ते कायमस्वरूपी एकत्र येतील का असं केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांना इंदापुरात पत्रकारांनी विचारलं असता ते कायमस्वरूपी एकत्र येतील असं मला वाटत नाही असं रामदास आठवले यांनी म्हटल आहे. 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येतील असं मला वाटत नाही.ते एकत्र आले तरी महाराष्ट्रात त्या दोघांची ताकद नगण्य आहे.राज ठाकरेंच्या एवढ्या मोठ्या सभा होऊनही त्यांचा एक माणूस निवडून येत नाही.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेला त्यांचा एक उमेदवार ही निवडून आला नाही.लोकसभेला त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता त्याचा फारसा फायदा झाल्याच मला दिसत नाही.राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तरी महायुतीवर परिणाम होणार नाही. असही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पुण्याच्या इंदापूर मध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी विक्रम शेलार, शिवाजीराव मखरे, बाळासाहेब सरवदे, संदिपान कडवळे, अमोल मिसाळ, हनुमंत कांबळे, अरविंद वाघ, कैलास कदम, किरण गानबोटे, लखन जगताप, रमेश शिंदे यांनी आठवले यांचा सत्कार केला.

मंत्री आठवले हे दौऱ्यावरती असताना काही वेळासाठी इंदापूर मधील शासकीय विश्रामगृहात थांबले होते आणि याच वेळी त्यांनी आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत कामकाजाचा आढावा घेतला.

प्रत्येक केस ला लव्ह जिहाद म्हणू नये...

लव्ह जिहाद चा कायदा असा आहे की अनेक वेळा मुलं मुली एकत्र येतात त्यांना त्यांची जात माहित नसते.तरी देखील एकत्र येऊन संसार थाटावा अशी त्यांची इच्छा असते.धर्म जात बाजूला ठेवून दोघे एकत्र येतात. प्रत्येक केस ला लव्ह जिहाद म्हणू नये.हिंदू मुलगी किंवा दलित मुलगी असेल आणि मुलगा मुस्लिम असेल तर धर्मांतर होऊ नये असं माझं मत आहे.ज्यावेळी कायदा बनेल त्यावेळी त्यात अशी तरतूद असावी. असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

नीलम गोऱ्हे यांनी उभाटा गटाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांवर केलेल्या आरोपावरूनही रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.निरम गोऱ्हे आदरणीय नेत्या आहेत, त्या समाजवादी म्हणून निवडून आल्या आहेत.काही वर्ष त्यांनी माझ्या पक्षात ही काम केले.नंतर त्या शिवसेनेत अनेक वर्ष होत्या, उद्धव ठाकरे यांनी त्यांना तीन चार वेळेला एमएलसी दिलेली आहे.आता एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेतून सभापती बनवल आहे.त्यांचा अनुभव काय आहे मला माहित नाही,त्यांनी किती मर्सिडीज गाड्या दिल्या आहेत हे माहीत नाही. असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांनाही खडे बोल सुनावले आहेत.संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले आहे, एका महिलेचा अपमान योग्य नाही असं मंत्री आठवलेंनी म्हटलं.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow