पुरंदरच्या सासवडमध्ये 36 वर्षीय तरुणाचा खून, पैशाच्या वादातून खून झाल्याची चर्चा ! पोलिसांकडून अधिक तपास सुरू

आय मिरर
पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका तरुणाचा खून करण्यात आलाय. सनी उर्फ पिंट्या सुनील जाधव असं या 36 वर्षीय खून करण्यात आलेल्या तरुणच नाव आहे. तो सासवड येथील जेजुरी नाक्यावरचा राहणारा आहे.
मृत जाधव याचा संशयित आरोपी संदेश आणि अवंतिका अवचरे यांच्या सोबत किरकोळ पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद झाला होता.या वादातच सनी उर्फ पिंट्या जाधव याचा खून करण्यात आला.अशी प्राथमिक माहिती स्थानिक लोक आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यात आलीय.
या संदर्भात सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात प्रक्रिया सध्या सुरू आहे.असं पोलिसांकडून सांगण्यात येतेय.दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
What's Your Reaction?






