त्याचं मन लय मोठं ! साडेचार तोळे वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र आणि बॅग केली परत,इंदापुरातील घटना

आय मिरर
इंदापूर तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावरील हॉटेल उदय या अधिकृत बस थांब्यावर एका प्रवासी महिलेची साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असलेली बॅग विसरली होती. ही बाब निदर्शनास येताच हॉटेलचे मालक समीर मुलाणी यांनी संबंधित महिलेला तिचे सोन्याचे दागिने असलेली बॅग परत केली आहे.
या घटनेने पुन्हा एकदा या हॉटेल चालकाच्या मनाचा मोठेपणा या सोबतच त्याचा प्रामाणिकपणा संपूर्ण इंदापूरकरांना दिसून आलाय.हॉटेल चालकाच्या या कृतीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
पाठीमागे देखील अशा पद्धतीच्या एक दोन घटना हॉटेल उदय वरती घडल्या होत्या. त्यावेळी देखील प्रामाणिकपणा दाखवत या हॉटेल चालकाने प्रवाशांना त्यांच्या मौल्यवान वस्तू आणि काही पैसे प्रामाणिकपणे परत केले होते. त्यातूनही त्यांची प्रवाशांबद्दल असलेली सेवेची निष्ठा आणि प्रामाणिकपणा दिसून आला होता. आज पुन्हा एकदा त्याच्या प्रामाणिकपणाचे दर्शन हीच ती महामंडळासह सर्वांनाच झाल आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातीत्याचं मन लय मोठं ! साडेचार तोळे वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र आणि बॅक केली परत,इंदापुरातील घटना पळसदेव नजीक हॉटेल उदय वरती एसटी महामंडळाचा अधिकृत थांबा आहे. दिवसा शेकडोबसिस या ठिकाणी थांबत असतात. हजारो प्रवास या ठिकाणी जेवणाचा नाश्त्याचा आस्वाद घेत असतात. याच दरम्यान ही कालची घटना घडली.
अक्कलकोट ते तळेगाव बस क्रमांक MH 14 BT 4568 अनिल चंद्रशा गायकवाड हे प्रवासी प्रवास करत होते. शनिवारी दि.17 मे रोजी बस हॉटेल उदय वरती सायंकाळी साडेपाच च्या सुमारास काही काळासाठी थांबली. याच वेळी अल्पोपहार घेण्यासाठी गायकवाड देखील बस मधून खाली उतरले. त्यांनी या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेतला मात्र सोबत असलेली बॅग ते हॉटेल उदय मध्ये ते विसरून गेले. लोणी काळभोर परिसरात गेल्यावर गायकवाड यांच्या लक्षात आले की आपली बॅग गहाळ झाली आहे ही बाब लक्षात आली. बस मध्ये शोध घेतला पण बॅग न मिळाल्याने वाहन चालक आणि वाहक यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. बस ज्या ठिकाणी जेवणासाठी अधिकृत बस थांबा असलेल्या हॉटेल उदय वर थांबली होती तिथे बॅग विसरली असावी असा अंदाज लावला.
वाहकाने हॉटेल मालक समीर मुलाणी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. झालेला प्रकार सांगितला त्यावर मुलाणी यांनी बॅग सापडली आहे.आम्ही ती व्यवस्थित ठेवली आहे आपण काळजी करू नका.कधीही येऊन ओळख पटवून तुमची बॅग घेऊन हवा असे सांगितले.
दुसऱ्या दिवशी दुपारी गायकवाड व त्यांची पत्नी हॉटेल उदय वरती आले खात्री पटवून आपली बॅग हॉटेल चालकाकडून ताब्यात घेतली. बॅग सुस्थितीत मिळाल्याने गायकवाड यांनी समाधान व्यक्त केलेच शिवाय हॉटेल चालकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांनी हॉटेल चालकाने आभार देखील मानले. समीर मुलाणी व त्यांचे वडील लतिब मुलाणी यांनी गायकवाड कुटुंबाला दोन घोट प्रेमाने चहा पाजून निरोप दिला.
What's Your Reaction?






