दिलासादायक ! तीन दिवसात उजनी धरणाच्या पाणी साठ्यात पावणेदोन टीएमसी ने वाढ

आय मिरर
पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर साठी जीवनदायीने ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये पावसाच्या पाण्यामुळे वाढ झाली आहे गेल्या तीन दिवसात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार राहिलेली आहे आणि यामुळे गेल्या तीन दिवसात उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये 1 पूर्णांक 89 टीएमसी इतका पाणीसाठा वाढला आहे.
सध्या उजनी धरणामध्ये एकूण 53 पूर्णांक 25 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. उजनी धरण हे आजच्या स्थितीला मायनस 19 पूर्णांक 43 टक्के इतक आहे. मायनस मध्ये असलेलं उजनी धरण प्लस मध्ये येण्यासाठी आणखी 10 पूर्णांक 41 टीएमसी इतकी पाण्याची आवश्यकता आहे.
सध्या पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस कोसळला आहे मात्र सद्यस्थितीला उजनी धरणात येणारा विसर्ग हा शून्य आहे. सहा जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
तत्पूर्वी सद्य परिस्थिती पाहता मागील आठवडाभरापासून महाराष्ट्रात सर्वच भागात अवकाळी पावसाने जोर धरलेला आहे. यात पिकांचा देखील काही ठिकाणी मोठ नुकसान झालेला आहे.
जर मान्सून पुढील दहा दिवसात महाराष्ट्रात दाखल झाला तर पावसाळा सुरू होणार आहे त्यामुळे एकंदरीत पुढील आठवडाभर आहे तीच परिस्थिती राहिली तर उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक सुरू होऊ शकते आणि त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी देखील झपाट्याने वाढू शकते शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बाब असेल.
What's Your Reaction?






