'खोक्या' आला झोक्यात ! प्रयागराज मधून पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Mar 12, 2025 - 11:03
Mar 12, 2025 - 11:04
 0  1629
'खोक्या' आला झोक्यात ! प्रयागराज मधून पोलिसांनी आवळल्या मुसक्या

आय मिरर

सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. खोक्या हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. सतीश भोसलेनं केलेले मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. बोक्याचे अनेक कारणे या व्हिडिओ मधून समोर आले होते. पोलीस सतीश भोसले यांच्या मागावर  होते. अखेर खोक्या पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

 बीड पोलिसांनी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत सतीश भोसले याला प्रयागराजमधून अटक केली आहे. काही दिवसांपासून फरार असलेला खोक्या अटकेत आला आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. 

पोलिसांसमोर खोक्यानं माध्यमांना मुलाखती दिल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला महाराष्ट्रात आणलं जाईल अशी माहिती आहे. खोक्यानं बॅटनं एका व्यक्तीला मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओ करुन समाजमाध्यमात दहशत निर्माण करण्यासाठी व्हायरल केला होता. आता पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सतीश भोसले याला अटक झालेली आहे. प्रयागराज पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक केली आहे. पोलिसांनी दोन पथकं नेमून देखील त्याला अटक करण्यात आली नव्हती. खोक्या भोसलेला अटक झाली आहे. सध्या तो प्रयागराज पोलिसांच्या ताब्यात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आज यश आलं आहे. गेल्या आठवड्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा सतीश भोसले याला अटक करण्यात आलं आहे. त्याला उद्यापर्यंत बीडमध्ये आणलं जाऊ शकतं. 

खोक्या ऊर्फ सतीश भोसलेवर तीन गुन्हे दाखल झाले आहेत. ढाकणे पितापुत्राला मारहाण केली होती, त्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गांजा घरी सापडल्यानंतर त्याचा देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खोक्या गेल्या दोन आठवड्यांपासून बीडमध्ये फिरत होता पण पोलिसांना तो सापडला नव्हता. सध्या त्याला अटक करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow