दोघे एकत्र आले अजितदादांनी हात पुढे केला हस्तांदोलन झालं ! मात्र दोघात नक्की काय चर्चा झाली ?

May 18, 2025 - 19:49
May 18, 2025 - 20:36
 0  364
दोघे एकत्र आले अजितदादांनी हात पुढे केला हस्तांदोलन झालं ! मात्र दोघात नक्की काय चर्चा झाली ?

आय मिरर 

पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. यासाठी रविवारी 18 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांचं हजारो सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र या सर्व गोष्टीत चर्चा झाली ती हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्या हस्तांदोलनाची भेटीची आणि दोघात झालेल्या गुपित चर्चेची. 

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती हायस्कूल या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रात उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते. अजित पवार केंद्रात शिरले आणि मतदान करत असतानाच त्यांच्या पाठीमागूनच माजी सहकार मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील हे देखील मतदान केंद्रावर दाखल झाले. याच वेळी एकाच मतदान कक्षात राजकारणात विळ्या भोपळ्याचे वैरत्व असणारे हे दोन नेत भेटले,स्वतःहून अजित पवारांनी हस्तांदोलनासाठी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे हात पुढे केला. हर्षवर्धन पाटील यांनीही खळखळून हसून अजित पवारांना हस्तांदोलन केले. दोघांनी एकमेकांना नमस्कार ही केला आणि चर्चाही केली.

अजित पवार म्हणाले हर्षवर्धन पाटील साहेब लक्ष राहू द्या आमच्यावर, त्यावर हसत हसत पाटील म्हणाले की चांगलं ठेवलंय की. झालं का मतदान तुमचं त्यावर पाटील म्हणाले नाही आता एवढ्यातच आलोय. त्यावर अजित पवार म्हणाले मी पाच संस्थेवर आहे मला माहितीच नाही. त्यावर गमतीने हर्षवर्धन पाटील म्हणाले शक्य नीट मारलेत ना दुसरं नाही ना काय ? त्यावर अजित पवार हसले आणि म्हणाले मारलेत की दाखवू का ? त्यावर पाटील खतखडून हसले.

राजकारणात खरंच कोणी कोणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो हेच पाटील आणि पवार यांच्या या भेटीने अवघ्या राज्याला दाखवून दिल्याची चर्चा आता सर्वत्र रंगले आहे आणि त्यामुळेच दिवसभर या दोघांच्या भेटीची सातत्याने पारा पारावर चर्चा रंगली होती. जेव्हापासून हर्षवर्धन पाटील अजित पवार हे राजकारणात सक्रिय झाले तेव्हापासून या दोन्ही नेत्यांचे विळ्या भोपळ्याचे नातं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला आहे. सातत्याने ही दोन्ही नेते एकमेकांना विरोधात राजकीय गरळ ओळखत असतात. मात्र राजकारणा व्यतिरिक्त या दोघांचे संबंधही तितकेच सलोख्याचे आहेत हेही तितकच खरं. 

2014 पासून हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्र विधान भवनापासून बाहेर आहेत. 2014 ला राज्याचे विद्यमान कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांना अजित पवारांनी इंदापूर विधानसभेच्या रिंगणात उतरवलं, त्यांना राजकीय ताकद दिली आणि दत्तात्रय भरणे यांकडून हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. पुढे 2019 ला युती तुटली तर बेहत्तर पण इंदापूरची जागा सोडणार नाही असा आक्रमक पवित्राच अजित पवारांनी घेतला आणि नाईलाजाने हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेस सोडावी लागली. मात्र त्या निवडणुकीत ही हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. पुढे 2024 च्या निवडणुकीत ही हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. याची सल हर्षवर्धन पाटील यांच्या मनात आजही आहे. त्यामुळेच हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्या या भेटीवर मात्र राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

ही भेट जरी मतदान केंद्रातील असली तरी या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधान आले आहे. दरम्यान मतदान करून बाहेर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गाडीत बसल्यानंतर ही पाटील यांनी पवारांच्या कानाशी लागून चर्चा केली. यात दोघांचा संवाद झाल्यानंतर अजित पवार यांनी मी फोन करतो हो काम होईल असे म्हणत ते पुढे रवाना झाले. मात्र हर्षवर्धन पाटील अजित पवारांच्या कानात काय बोलत आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून होतं.

नेमकं दोघात काय बोलणं झालं याची उत्सुकता सर्वांनाच होती.यावर हर्षवर्धन पाटील यांना विचारल्यानंतर ते म्हणाले की पवार आमच्या पॅनलला मतदान करा असे मला म्हणाले,मात्र नेमकी दोघांमध्ये कोणती चर्चा झाली? पाटील यांनी पवारांना कोणते काम सांगितले आहे का ? की आणखी कोणत्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत? कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे बोलले जात असल्याने पुन्हा पवार ,पाटील यांच्या भेटीची चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow