त्यांची ओळखचं 'देव माणूस' म्हणून हाय, माणसं वाचवता वाचवता ते मुक्या प्राण्यांसाठी ही धावले अन् धन्य धन्य पावले

Apr 13, 2024 - 17:50
Apr 13, 2024 - 17:51
 0  169
त्यांची ओळखचं 'देव माणूस' म्हणून हाय, माणसं वाचवता वाचवता ते मुक्या प्राण्यांसाठी ही धावले अन् धन्य धन्य पावले

आय मिरर(देवा राखुंडे)

अकलुज येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम.के. इनामदार यांना देवमाणूस म्हणून पश्चिम महाराष्ट्रात ओळखले जाते.अनुभव आणि शिक्षणाने प्रगल्ब असणाऱ्या डॉ. इनामदार यांनी आजपर्यंत अनेकांना मरणाच्या दारातून बाहेर काढलेय त्यामुळे इनामदार यांच्या वरती जीव ओवाळून टाकणारे ही तितकेच आहेत. आज शनिवारी 13 एप्रिल रोजी डॉ.इनामदार यांचा वाढदिवस आय मिरर कडून अशा देव माणसाला सर्वप्रथम वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा……

डाॅ.इनामदार हे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आहेत.त्यांनी आजपर्यंत रुग्णसेवेत मोठं योगदान दिलेय. मात्र ते केवळ रुग्णांची सेवा करुन थांबले नाहीत.त्यांना पशुप्राण्यांप्रति तितकीच ओढ आहे.म्हणूनचं ते नेहमी इंदापूरातील निमगांव केतकी परिसरातील वनीकरणात फेरफटका मारण्यासाठी येत असतात. आणि तिथल्या मुक्या प्राण्यांप्रती सेवा देत असतात. 

आज चिंकारा व इतर वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी निमगांव केतकी येथे वन विभागाच्या पाणी साठवून टाक्यांमध्ये पाणी सोडून डाॅ.इनामदार यांनी आपला वाढदिवस साजरा केला.माणसे बोलू शकतात,आपली गरज काय ते सांगू शकतात पण मुके जीव बोलू शकत नाहीत म्हणून माणसांनी त्यांच्या गरजा ओळखायला हव्यात मी त्यांच्यासाठी काही तरी करु शकलो याचं मला समाधान मिळालं अशी प्रतिक्रिया डाॅ.इनामदार यांनी दिली. 

यासोबतचं यंदा तीव्र उन्हाळा आहे.अगदी फेब्रुवारीपासूनचं उन्हाच्या झळा सर्वांना जावताहेत.अशा गंभीर स्थितीत याचा फटका वन्यजीवांना बसू नये म्हणून डॉ. इनामदार यांनी उन्हाळा संपेपर्यंत दर आठवड्याला एक टँकर पाणी वन्य प्राण्यांसाठी सोडण्याचा मनोदय व्यक्त करत इतरांनी आपापल्या परिसरात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन ही त्यांनी केलयं.

यावेळी उपस्थित अँड. श्रीकांत करे,अँड.सचिन राऊत,मुकुंद पाटील ,आप्पा देवकाते ,राजू पवार उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow