इंदापूरात श्रीराम मंदिरातील कार्यक्रमास हर्षवर्धन पाटील - प्रदीप गारटकरांची उपस्थिती

Jan 22, 2024 - 16:27
 0  217
इंदापूरात श्रीराम मंदिरातील कार्यक्रमास हर्षवर्धन पाटील - प्रदीप गारटकरांची उपस्थिती

आय मिरर

अयोध्येमध्ये आज श्री राम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठाचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्त इंदापूर शहरातील व परिसरातील मोठ्या संख्येने अनेक राम भक्त इंदापूर येथील श्रीराम मंदिरामध्ये उपस्थित होते.यावेळी या मंदिरामध्ये आयोद्येतील श्री राम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मोठ्या स्किन द्वारे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. या सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी संपूर्ण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण नागरिकांमध्ये बसून पाहिले तसेच यावेळी त्यांच्या हस्ते श्रीरामाची आरती करण्यात आली.

मोठ्या संख्येने राम भक्तांनी जय जय श्री रामाचा जयघोश करीत, आनंदी भक्तीमय वातावरणात या सुंदर क्षणाचा व प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेचा क्षण ,प्रसंग आणि ते वैभव आपल्या डोळ्यामध्ये साठवून राम भक्तांनी श्री रामाचे दर्शन घेतले. 

यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' सायंकाळी 4 वाजता प्रभू रामचंद्राच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून इंदापूर नगरपालिकेच्या प्रांगणात सायंकाळी 7 वाजता दीपोत्सव साजरा होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow