इंदापूरात पतंजली योग परिवाराने साजरा केलं भव्य रक्षाबंधन ! शेकडो महिला साधकांचा सहभाग

अय मिरर
इंदापूरमध्ये पतंजली योग परिवाराकडून सामुदायिक रक्षाबंधन पार पडलयं. यात शेकडो महिला सदस्यांनी सहभागी होत योग साधकांना औक्षण करीत निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देत रक्षाबंधन साजरं केलयं.
रक्षाबंधनाचे औचित्य साधून गुरुवारी दि.३१ आँगस्ट रोजी शहा सांस्कृतिक भवन येथे स्थायी वर्गामध्ये रक्षाबंधन सोहळा उत्स्फूर्तपणे व दिमाखदार साजरा करण्यात आला. उपस्थित सर्व पुरुष साधकांना महिला भगिनी यांनी औक्षण केले व उदंड व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी स्थायी वर्गातील बंधूंच्या प्रति आपुलकीचं मायेचा जिव्हाळ्याचं वातावरण सर्व भगिनींच्या अंतकरणांमध्ये दिसून आले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दत्तात्रय अनपट व मदन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पुरुष व महिला भगिनींनी अथक परिश्रम घेतले.
पतंजली योग परिवाराच्या माध्यमातून दररोज शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे योग प्राणायामाचे वर्ग मोफत चालवले जातात. या माध्यमातून दुर्धर आजारावरती असंख्य पुरुष व महिला साधकांनी मात केली असून सध्या ते निरोगी व आनंदी जीवन जगत आहेत.
पतंजली योग परिवाराच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबविले जातात, त्याचबरोबर पारंपारिक खेळ सण इत्यादी उत्साहात साजरे केले जातात. सध्या दररोज येणाऱ्या साधकांची संख्या अडीचशे असून सर्व पुरुष व महिला साधक उत्साहाने कोणत्याही उपक्रमात सहभागी होतात.
What's Your Reaction?






