'नाथ साहेबाच चांगभलं' म्हणत रात्रभर चालला श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा !

राहुल शिंदे,पुरंदर
'नाथ साहेबांच चांगभलं' असा जयघोष करत पुरंदर तालुक्यातील वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
मंगळवारी रात्री आठ वाजता हा विवाह सोहळ्याच्या विविध विधींना सुरवात झाली होती. तर आज बुधवारी पहाटे दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी हा विवाह सोहळा संपन्न झाला.
देवाचे सेवेकरी मानकरी आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर मध्ये पार पडला.या सोहळ्यासाठी अनेक गावांमधून पालख्या आणि काठ्या वीर मध्ये दाखल झाल्या आहेत.
मंगळवारी सायंकाळी कोडीत येथील देवाची पालखी वीर गावामध्ये मध्ये आली यानंतर भेटीचा कार्यक्रम पार पडला.वीर येथील ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आणि रात्री दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी विवाह सोहळा पार पडला.विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली.पुढील दहा दिवस वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबाचा यात्रा उत्सव सुरू असणार आहे.
What's Your Reaction?






