इंदापूरची अस्मिता जपली जाणार ! बाह्यवळणावर आहे त्याच ठिकाणी होणार विरश्री मालोजीराजे भोसले यांचे स्मारक - आ.दत्तात्तय भरणे 

Feb 22, 2024 - 17:15
Feb 22, 2024 - 17:15
 0  1135
इंदापूरची अस्मिता जपली जाणार ! बाह्यवळणावर आहे त्याच ठिकाणी होणार विरश्री मालोजीराजे भोसले यांचे स्मारक - आ.दत्तात्तय भरणे 

आय मिरर(देवा राखुंडे)

इंदापूर बाह्यवळणावरील इंदापूरची अस्मिता म्हणून ओळखले जाणारे वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे स्मारक रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली पाडण्यात येणार होते तसा प्रयत्नही झाला होता मात्र आता यावरती तोडगा निघाला आहे हे स्मारक याच ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी 22 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.यासाठी वास्तू विशारद यांची नेमणूक करून त्यांच्याकडून दोन ते तीन आराखडे तयार करून बाह्यवळण येथेच भव्य आणि आकर्षक शिल्प उभारले जाईल अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

इंदापूर बाह्य वळणावरील विरश्री मालोजीराजे भोसले चौकात सध्या राष्ट्रीय महामार्ग रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असून मागील काही दिवसापूर्वी या ठिकाणच्या स्मारक पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेनंतर शिवप्रेमी संतप्त झाले होते. हे स्मारक इंदापूरची अस्मिता असून ते आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात यावे त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शिवप्रेमी केली होती. 

गुरुवारी दि.२२ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी बैठक पार पडली आहे.या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, भूसंपादन समन्वयक भिसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनिल ढेपे, तहसिलदार श्रीकांत पाटील, नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी राम कापरे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता भोसले, इंदापुर मधील शिवभक्त राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,मा.उपनगराध्यक्ष अरविंद वाघ,मा.नगरसेवक अतुल शेटे पाटील, अमर गाडे, शिवभक्त भरत जामदार आदी उपास्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि N.H.A.I. चे अधिकारी या स्मारकासाठी याच चौकात जागेची पाहणी करून घेतील. त्याच जागेवर वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे शिल्प उभारले जाईल. इंदापूरची अस्मिता राखण्यासह भव्य दिव्य असे शिल्प याठीकाणी निर्माण केले जाईल त्यासाठी आपण कायम तत्पर आहोत असंही भरणे यांनी म्हटलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow