इंदापूरातील ऐतिहासिक गढी आणि दर्गा संवर्धन व सुशोभीकरण बाबातचे आराखडे वित्त व नियोजन विभागाकडे सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश

Aug 31, 2023 - 19:40
 0  216
इंदापूरातील ऐतिहासिक गढी आणि दर्गा संवर्धन व सुशोभीकरण बाबातचे आराखडे वित्त व नियोजन विभागाकडे सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश

आय मिरर

इंदापुर शहरातील वीरश्री छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे संवर्धन व हजरत चांदशावली दर्गा संवर्धन व सुशोभीकरणासंर्दभातील आराखडे वित्त व नियोजन विभागाकडे सादर करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

वीरश्री छत्रपती मालोजी राजे भोसले यांच्या गढी संवर्धन व चांदशावली दर्गा संवर्धन व सुशोभीकरण संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीसाठी मुख्य सचिव वित्त विभाग, अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग डॉक्टर नितीन करीर ,नगर विकास विभाग प्रधान सचिव डॉ गोविंदराज प्रधान, सचिव पर्यटन श्रीमती राधिका रस्तोगी यांसह व्हीसीद्वारे पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख ,जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे मुख्य अभियंता उपस्थित होते.

या बैठकीत आराखड्याची सादरीकरण करण्यात आले.या आराखड्याबाबत अजित पवार यांनी मालोजीराजे भोसले यांच्या गडीचे व हजरत चांदशावली बाबांच्या दर्गाच्या परिसर जागेची माहिती व सद्यस्थिती व काय आहे व काय करण्यात येईल हेरिटेज दर्जा पद्धतीने सुशोभीकरण करण्याच्या सूचना केल्या.तसेच जुन्या काळातील इतिहास नव्या पिढीला कळावा याबाबतची याबाबत पुरातत्त्व विभागाकडून इतिहासाची माहिती घेऊन त्याबाबत अहवाल जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण आराखडा तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना करून आवश्यक निधीची उपलब्धता करण्यात येईल असे आदेश देण्यात आले. 

जिल्हाधिकारी पुणे यांनी आराखडा तयार करून वित्त व नियोजन विभागाकडे सादर करावा याबाबतच्या सूचनाही उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीप्रसंगी केल्या.

यावेळी इंदापुर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, शिवप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते भारत जामदार,आझाद पठाण, ओंकार साळुंके हे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow