Indapur भारतीय सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी पुण्याच्या इंदापुरात तिरंगा रॅली

आय मिरर
भारत पाकिस्तान युद्ध सध्या थांबलं असलं तरी यात भारताच्या सैन्याने पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं. सैन्याचं हे मनोबल उंचावण्यासाठी पुण्याच्या इंदापुरात तिरंगा रॅली काढण्यात आली.यात माजी सैनिक,शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि समस्त इंदापूरकर सहभागी झाले होते.यावेळी भारत माता की जय,जय जवान जय किसान अशा जोरजोरात घोषणा देण्यात आल्या.
उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने आज मातृदिनाच्या निमित्ताने राज्यभर अनेक ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या इंदापूर मध्ये देखील या रॅलीचे आयोजन केले होते. इंदापूर शहराचे ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर मंदिर पासून या रॅलीला सुरुवात झाली आणि या रॅलीचा समारोप महापुरुषांना अभिवादन करून स्वातंत्र्य सैनिक स्मृती स्तंभ नगरपरिषद प्रांगण येथे करण्यात आला.
दरम्यान यावेळी आयोजकांच्या वतीने वीर पत्नी व वीरमाता यांचा सन्मान करण्यात आला. भारत पाकिस्तान युद्धातील शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आल्याची माहिती शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख सिमा कल्याणकर यांनी दिली .
माजी सैनिक कैलास गवळी, सामाजिक कार्यकर्ते धरमचंद लोढा, हमीद आतार, प्रशांत सिताप,जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजचे जयंत नायकुडे, प्रशांत बर्गे यांचे या कामी विशेष सहकार्य लाभले. तिरंगा रॅली यशस्वी करण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख अँड.आनंद केकाण, उपशहरप्रमुख शाबूद्दिन सय्यद, तालुका प्रमुख राधिका जगताप, सोमनाथ लांडगे यांनी प्रयत्न केले.
What's Your Reaction?






