जुनी पेन्शन योजना लागू करा ! इंदापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू

Aug 30, 2024 - 22:11
Aug 30, 2024 - 22:14
 0  93
जुनी पेन्शन योजना लागू करा ! इंदापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू

आय मिरर

जुनी पेन्शन योजना तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून गुरुवारी दि.29 रोजी पासून बेमुदत संप सुरु केला आला.यात अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी केलेली नाही. तसेच जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. त्यामुळे राज्यभरातील 3 हजार अधिकारी आणि 60 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष आहे. यासंदर्भात नगरविकास विभाग आणि नगरपरिषद प्रशासन संचालनालयास वेळोवेळी निवेदन दिले आहे; परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या आणि मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.याविरोधात संप करण्यात येत आहे.

दरम्यान इंदापूर नगरपरिषद समोर संपकरी कर्मचाऱ्यांनी हातामध्ये फलक घेत मागण्याच्या पूर्तेतेची मागणी केली.यावेळी इंदापूर नगरपरिषद कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी औक्षणि मते,रश्मी बारस्कर,श्रद्धा वळवडे, पवन भानवसे, गोरक्षनाथ वायाळ, रविराज राऊत, अमर शेडगे, शार्दुल ताजणे, शिवदत्त भोसले, रमेश शिंदे, सुरेश सोनवणे, मोहन शिंदे, अलताफ पठाण, विलास चव्हाण, मोहन ढोबळे,दीपक कवितके, भागवत मखरे व लीलाचंद पोळ,दत्तात्रय ढावरे, अशोक अडसूळ यांचेसह इतर नगरपरिषद कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow