इंदापूरकरांकडून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला क्रांती मशाल रॅली
आय मिरर
देशाच्या स्वातंत्र्याला 77 वर्षे पूर्ण झाल्याने आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो इंदापूरकरांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला इंदापूर शहरातून हातात मशाली घेवून रॅली काढत भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.
इंदापूर येथे मशाल रॅलीत इंदापूर शहरातील युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, बाळासाहेब ढवळे, वसंत मालुंजकर, स्वप्नील राऊत, अमर गाडे, सामजिक कार्यकर्ते अनिल राऊत, अहमदरजा सय्यद, प्रा.अशोक मखरे,दादासाहेब सोनवणे, इम्रान शेख आदी इंदापूरकर सहभागी झाले होते.
इंदापूर नगर परिषदेपासून मशाल रॅलीला सुरवात करण्यात आली. पुढे हनुमान मंदिर मार्गे खडकपुरा, शेख मोहल्ला, नेहरू चौक, मुख्य बाजार पेठ, कांबळे गल्ली, पंचायत समिती मार्गे, भारत माता की जय, जय जवान जय किसान व देशभक्तीपर घोषणा देत, इंदापूर नगरपरिषदे समोर सांगता सभेने रॅली संपन्न झाली.
तत्पूर्वी नगरपरिषदेच्या प्रांगणात शारदा स्वरांजली सिंगर्स ग्रुप प्रस्तुत, "एक शाम देश के नाम" या देशभक्तीपर गीतांचा सदाबहार कार्यक्रम, संगीतगुरू सौ. शारदा बलभीम नागपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी इंदापूर शहरातील नागरिकांनी कार्यक्रमासाठी मोठी गर्दी केली होती.
आता युवकांनी जबाबदारी घेण्याची गरज…
मागील 35 वर्षापासून अखंडपणे आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वेसंध्येला मशाल रॅली काढत असतो. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. युवकांना देशाप्रती प्रेम निर्माण व्हावे. युवकांना स्वातंत्र्याचे महत्व कळावे. यासाठी मशाल रॅली काढली जाते. युवकांनी जबाबदार व्हावे. ही जबाबदारी युवकांनी आपल्या खांद्यावर घ्यावी. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केले.
What's Your Reaction?