इंदापूर तालुका हादरला,चाकूने सपासप वार करुन महिलेचा खून !

Dec 5, 2024 - 07:22
Dec 5, 2024 - 21:46
 0  10303
इंदापूर तालुका हादरला,चाकूने सपासप वार करुन महिलेचा खून !

आय मिरर

इंदापूर तालुक्यातून धक्कादायक बातमी आहे.चाकूने सपासप वार करुन एका तेहत्तीस वर्षीय महिलेचा खून करण्यात आलाय.सुनिता दादाराव शेंडे वय ३३ वर्षे असं खून झालेल्या महिलेचे नांव असून ती इंदापूर तालुक्यातील शेंडेवस्ती निमगांव केतकी येथील रहिवासी आहे.

याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर रा. सुरवड ता. इंदापुर जि.पुणे याच्या विरोधात इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पहाटे चार च्या सुमारास आरोपीला इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय.

ही घटना दि.04 डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकी सराफवाडी रोडवरील अजिनाथ मोरे यांच्या पत्र्याच्या शेडखाली घडलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि. 04 डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ ते साडे आठ च्या सुमारास मयत महिलेचा पती दादाराव निवृत्ती शेंडे यांच्या ओळखीचे ज्ञानेश्वर बबन रासकर यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणामुळे त्यांच्या पत्नीच्या डोक्यात, पोटावर, छातीवर, हातावर चाकूने वार केले.यात सुनिता शेंडे यांचा मृत्यू झाला. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.निरीक्षक गावडे करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow