निवडणूका जवळ येताचं मनसेनं लक्ष केलं केंद्रीत इंदापूरच्या निमगांवात मनसेनं शाखा उघडली ! 

Sep 4, 2023 - 06:35
Sep 4, 2023 - 06:36
 0  117
निवडणूका जवळ येताचं मनसेनं लक्ष केलं केंद्रीत इंदापूरच्या निमगांवात मनसेनं शाखा उघडली ! 

आय मिरर

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येताच बारामती लोकसभा मतदारसंघ आणि इंदापूर विधानसभेमध्ये राजकीय वारे वाहू लागले आहेत. इंदापूर विधानसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लक्ष केंद्रित केले असून शनिवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी मनसेचे नेते वसंत मोरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केलाय.

मनसेचे फायर नेते वसंत मोरे यांच्या या दौऱ्याला बारामती लोकसभा मतदारसंघात भरघोस प्रतिसाद मिळाल्याचेही पाहायला मिळालं.अनेक तरुणांनी वसंत मोरे यांसोबत फोटोसेशनही केलं तर याच दरम्यान वसंत मोरे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नूतन शाखेचे अनावरण देखील करण्यात आले.

निमगाव केतकी शाखा प्रमुख म्हणून कल्पेश यादव यांची नेमणूक झाली असून या उद्घाटना प्रसंगी पुणे जिल्हाध्यक्ष पोपट सूर्यवंशी, जिल्हा सचिव रामभाऊ काळे,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र हजारे राजेंद्र हजारे,इंदापूर तालुकाध्यक्ष संतोष भिसे,बारामती तालुकाध्यक्ष निलेश वाबळे, अँड.नितीन राजगुरू,राजु भोंग,सुभाष जाधव, ओंकार शेंडे, रोहित शेंडे, मनोज हेगडे, निखिल भोंग, गणेश भोंग, जय कुदळे, विनायक भोंगळे,अनिकेत पिंगळे, आकाश जाधव, सागर भोंगळे, नितीन भोंगळे,आदी मान्यवर उपस्थित होते. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow