Vijay Shivtare : विजय शिवतारे हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांच टेंन्शन वाढवलं ; शिवतारे बारामती लोकसभेला अपक्ष शड्डू ठोकणारच ! एकमताने ठराव मंजूर

Mar 13, 2024 - 14:53
Mar 13, 2024 - 15:02
 0  1720
Vijay Shivtare : विजय शिवतारे हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांच टेंन्शन वाढवलं ; शिवतारे बारामती लोकसभेला अपक्ष शड्डू ठोकणारच ! एकमताने ठराव मंजूर

आय मिरर

बारामती लोकसभेला अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेला अपक्ष उतरणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.यासंदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून त्यामुळे बारामती लोकसभेला तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. या निर्णयाने शिंदे आणि अजित पवार गटातही ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.

ही जनतेनं हातात निवडणूक घेतली असून हुकूमशाही सरंजामशाही चालणार नाही. जनता मावळ तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार संघातील आम्ही 41 वर्षे तुम्हाला मत देतो, पुरंदरला काय एक प्रोजेक्ट दिला तो दाखवा? ठराविक काही असतील, पण शेतकऱ्यांना काय दिलं? जे बारामती बागायत आहे ते ब्रिटिश कालापासून असल्याचे ते म्हणाले.

आज (13 मार्च) रोजी सासवडमध्ये माजी आमदार विजय शिवतारे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत शिवतारे यांच्या उमेदवारीचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे विजय शिवतारे बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगतिले. विजय शिवतारे यांच्या भूमिकेनं बारामतीत महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत.

त्यांच्या मुलाविरुद्ध प्रचार केला होता तो राजकारणाचा एक भाग होता

विजय शिवतारे म्हणाले की, सव्वा तास बैठक चालली आणि एकमताने ठराव पास करण्यात आल. बारामती लोकसभा मतदारसंघ हा काय कोणाचा सातबारा नाही. मी देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेच्या मतदारसंघ आणि मालकी कोणाची नाही. सहा विधानसभेचे मतदारसंघ आहे. आपला स्वाभिमान जागृत होऊन आपण लढलं पाहिजे. विशेषतः अजित पवार 2019 च्या निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाविरुद्ध प्रचार केला होता तो राजकारणाचा एक भाग होता आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. वैयक्तिक काही नव्हतं. परंतु, अजित पवारांनी सभ्यतेची सगळी पातळी ओलांडली. ते म्हणाले की, अजित पवार यांनी नीच पातळी ओलांडूनही मी माफ केलं आहे. त्यांचा सत्कार देखील केला. तरीही त्यांची गुर्मी तशीच होती, अशी टीका त्यांनी केली.

हर्षवर्धन पाटील विधानसभेच्या शब्दावर अडून…

दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे अजित पवार यांचा आलेला कडवा अनुभव पाहता 2024 च्या लोकसभेमध्ये सावध भूमिका घेत आहेत.अगोदर 2024 च्या विधानसभेचे बोला मगच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचा पवित्र हर्षवर्धन पाटील यांनी घेतला आहे.सध्या हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांमध्ये संकल्प विजयाचा संकल्प 2024 च्या या उपक्रमांतर्गत मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्यामुळे अजित पवार यांचे टेन्शन वाढलंय.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow