बिग ब्रेकिंग || इंदापुरातील शिवधर्म फाउंडेशनचे दूध आंदोलन अकराव्या दिवशी मागे,दोन दिवसात निघणार तोडगा
आय मिरर
शासन निर्धारित दाराप्रमाणे दुधाची शेतकऱ्यांकडून खरेदी करावी या मागणीसाठी पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तहसील समोरचे शिवधर्म फाउंडेशनचे गेल्या 11 दिवसापासून आमरण उपोषण सुरू होते. दीपक काटे आणि माऊली वनवे हे दोघे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले होते. अखेर आंदोलनाच्या 11 व्या दिवशी सुरू असलेलं आमरण उपोषण मागे घेण्यात आलेय. राज्य सरकारच्या वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू असून दोन दिवसात दूध दर प्रश्नावर तोडगा निघेल अस आश्वासन जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सतीश डोईफोडे यांनी आंदोलकांना दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलेय.
या संदर्भात आंदोलन दीपक काटे म्हणाले की गेल्या ११ दिवसापासून आमचा संघर्ष सुरू होता.बुधवारी दिनांक 13 डिसेंबर रोजी राज्य सरकारची दूध खरेदीदारांसोबत बैठक पार पडली आहे.यासोबत आज गुरुवारी देखील बैठक पार पडली आहे. पुढील दोन दिवसात राज्य सरकारचा आदेश पारित होईल.आमची जी मागणी होती की शासन निर्णय 34 रुपये प्रति लिटर दराप्रमाणे शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करावी ही मागणी पूर्ण होत आहे. त्यामुळे उपोषण मागे घेतले. मंत्री विखे पाटील यांकडून नागपूरमध्ये बैठकीसाठी निरोप आला आहे. राज्य सरकारने दोन दिवसात निर्णय घेतला नाही तर पुन्हा संविधानिक पद्धतीने उपोषण करणार.
What's Your Reaction?