Breaking इंदापूरच्या नरुटवाडीत अज्ञात प्राण्याचा शेळ्या बोकडांवर हल्ला,७ शेळ्यांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी,३ शेळ्या पळवल्या  

Dec 14, 2023 - 10:51
Dec 15, 2023 - 10:05
 0  1615
Breaking इंदापूरच्या नरुटवाडीत अज्ञात प्राण्याचा शेळ्या बोकडांवर हल्ला,७ शेळ्यांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी,३ शेळ्या पळवल्या  

आय मिरर

पुण्याच्या इंदापूर मध्ये नरुटवाडी येथील सय्यदवस्तीवर शेळी बोकडांवर अक्षात हिंस्र प्राण्याने हल्ला केलाय.यात ७ शेळी आणि बोकडांचा जागीच मृत्यु झाला आहे. तर दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.या शिवाय ३ शेळ्या बोकडं ही घटनास्थळावरुन या अज्ञात प्राण्याने पळवल्या आहेत.

सय्यदवस्ती वरील साजिद इब्राहिम सय्यद यांच्या २ बोकडं आणि ४ शेळ्यांचा मृत्यू झाला असून दोन बोकडं गायब आहेत. तर नसिर दिलावर सय्यद यांच्या एका शेळीचा मृत्यु झाला असून दोन गंभीर जखमी झाल्या आहेत. तर एक शेळी अज्ञात प्राण्याने घटनास्थळावरुन पळवली आहे. 

या घटनेनंतर इंदापूर वनविभाग पथक व इंदापूर पंचायत समितीच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली असून मृत शेळी बोकडांच पंचनामा केला आहे.नेमकी ही घटना कशी घडली कोणत्या प्राण्याने हल्ला केला असावा याचा शोध घेतला जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow