माझ्याकडे 7 लाख असते तर मी गाडी कशाला चालवली असती ? ट्रकचालकाने पोटतिडकीने सांगितलं ; वाचा तो काय म्हणाला 

Jan 2, 2024 - 17:05
 0  482
माझ्याकडे 7 लाख असते तर मी गाडी कशाला चालवली असती ? ट्रकचालकाने पोटतिडकीने सांगितलं ; वाचा तो काय म्हणाला 

आय मिरर 

केंद्र सरकारच्या मोटर वाहन कायद्याला देशभरातील वाहनचालक संघटनांकडून विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर संप पुकारण्यात आला आहे. संप पुकारल्यामुळे राज्यभरात पेट्रो-डिझेलचा तुटवडा जाणवू लागला आहे.

सोबतच जीवानावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यावर देखील याचा मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान यावर आता ट्रक चालकांकडून देखील प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या बोलण्यातून हातबलता दिसून येत आहे.

नवीन कायद्याला ट्रक चालक आणि मालकांकडून मोठा विरोध होत आहे. त्यांनी आपल्या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या आहेत. आमच्याकडे सात लाख असते तर आम्ही रस्त्यावर का फिरलो असतो? आम्हाला दहा वर्षांची शिक्षा झाली तर आमच्या लोकरा-बाळांंचं काय? त्यांना कोण सांभाळणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सोबतच जर कायदा मागे घेतला नाही तर नोकऱ्या सोडल्याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे या संपामुळे राज्यभरात पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. नाशिक शहरात अर्ध्याहून अधिक पेट्रोल पंप बंद आहेत. तर जे काही पेट्रोल पंप सुरू आहेत, त्याममध्ये देखील आता अवघे काही तास पुरेल इतकाच पेट्रोलचा साठा शिल्लक आहे. जळगावमधील तर जवळपास सर्वच पेट्रोल पंप इंधन पुरवठा नसल्यामुळे बंद आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow