मोठी बातमी | रविवारी शरद पवार मारकडवाडीत ! ग्रामस्थांशी पवार करणार चर्चा
आय मिरर
रविवारी माजी केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी मध्ये जाणार असून ते मारकडवाडी ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधणार आहेत. शरद पवार रविवारी सकाळी १० वाजता मारकाडवाडीत दाखल होणार असून ते ग्रामस्थांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
ईव्हीएम विरोधात मारकडवाडी येथे बॅलेट पेपर वरील मतदान होणार होते.तत्पूर्वीच प्रशासनाने मारकडवाडीत जमावबंदी कायद्या लागू केला. त्यामुळे बॅलेट पेपर वरील मतदान रद्द झाले होते.आता त्यानंतर जेष्ठ नेते शरद पवार मारकडवाडीत जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
जमाबंदीच्या आदेश असल्याने आणि प्रशासनाचा दबाव असल्याने आम्ही वेगळ्या मार्गाने न्याय मिळवू.शालेय मुलांचे आणि इतर कोणाचही नुकसान होऊ नये. गावाची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा घेतला निर्णय असल्याचं आ.उत्तम जानकर यांनी म्हटले होते.येत्या पंधरा दिवसात ईव्हीएम बाबतचे सर्व पुरावे महाराष्ट्रला देणार असल्याचं ही जानकर यांनी सांगितले होते.
What's Your Reaction?