पवारांच्या बारामतीत भाजपची जोरदार मोर्चेबांधणी ! जम्बो कार्यकारिणी जाहीर

Jan 2, 2024 - 16:54
 0  584
पवारांच्या बारामतीत भाजपची जोरदार मोर्चेबांधणी ! जम्बो कार्यकारिणी जाहीर

आय मिरर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. राज्याचं लक्ष लागून असणाऱ्या पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीत भाजपने चंग बांधला आहे. आगामी लोकसभेसाठी बारामती विधानसभा मतदारसंघात भाजपने जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे.

यामध्ये एकूण ४३ पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. आगामी काळात बारामती लोकसभा मतदारसंघ महायुती म्हणून लढणार असल्याचे जाहीर झाले आहे. या अनुषांगाने भाजपने कंबर कसली आहे.

भाजपचे बारामती शहराध्यक्ष सुजित वायसे यांनी आज विविध समाजाच्या, व्यापार संघांच्या आघाड्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये शहर सरचिटणीस पदावर चंद्रकांत नामदेव केंगार, प्रमोद डिंबळे पाटील आणि महेश गावडे यांची निवड केली आहे. आगामी निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत पहायला मिळणार आहे.

सुप्रिया सुळे बारामतीत तळ ठोकून

पुणे जिल्ह्यातील सर्व लोकसभा जागांवर अजित पवार गटाने लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यात बारामती आणि शिरुर लोकसभा मतदार संघात शरद पवार गटातील उमेदवाराचा पराभव करण्यासाठी अजित पवार गटाने विशेष तयारी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता आहे. यामुळे आता या दोन्ही निवडणुकीत बारामतीवर लक्ष सुप्रिया सुळे यांनी केंद्रीत केले आहे. मी बारामती तळ ठोकून राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी बारामतीत उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळे ऍक्टिव्ह मोडवर आल्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow