19 वर्षीय गर्भवती महिलेने उचललं टोकाचं पाऊल; कोंढवा येथील घटना

Jul 3, 2025 - 17:06
 0  424
19 वर्षीय गर्भवती महिलेने उचललं टोकाचं पाऊल; कोंढवा येथील घटना

आय मिरर 

कोंढवा भागात अवघ्या 19 वर्षीय गर्भवती महिलेने जीवनाला कंटाळून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. बुधवारी दुपारी हा प्रकार घडला असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

खजुरा सुनार (वय 19) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुनार कुटूंब नेपाळमधील रहिवासी आहे. मागील काही महिन्यांपासून महिला व तिचा पती कोंढवा परिसरातील साईबाबानगर येथील एका सोसायटीत भाड्याने राहत होते. पती सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. तर महिला गृहिणी होती.

पती नेहमीप्रमाणे कामावर गेल्यानंतर दुपारी या महिलेने राहत्या घरात गळफास लावला. दरम्यान पती घरी आला असता आतून दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. त्याने लगेच दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा पत्नीने ओढणीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. यानंतर नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पाहणी केली असता, तिने लिहिलेली सुसाईड नोट मिळाली. कोंढवा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow