पुणे ग्रामीण पोलिसांकडून स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणातील आरोपीचे स्केच जारी

Jul 4, 2025 - 06:19
Jul 4, 2025 - 06:22
 0  427
पुणे ग्रामीण पोलिसांकडून स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणातील आरोपीचे स्केच जारी

आय मिरर (निलेश मोरे)

पंढरपूर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर स्वामी चिंचोली (ता.दौंड) गावाजवळ पहाटे च्या सुमारास गंभीर प्रकार घडला आहे. दिनांक ०१ जुलै २०२५ रोजी पाहटे साडे चार दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्याच्या साथीदारासह धारदार शस्त्राचा (कोयता) धाक दाखवून कुटुंबाला लुटले.

त्यानंतर त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या घटनेची नोंद दौंड पोलीस स्टेशनमध्ये झाली असून, घटनेच्या गांभीर्याची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विशेष तपास पथके गठित करण्यात आली असून सदर आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले असून, त्याद्वारे त्याचा शोध घेण्यात येत आहे.

कोणालाही या रेखाचित्रातील व्यक्तीची माहिती असल्यास कृपया खालील अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासना कडून देण्यात आले आहे.

पोलिस उपअधीक्षक दौंड बापुराव दडस – 9049664673

सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे (पुणे ग्रामीण) –9823165080

सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजी मोहिते (पुणे ग्रामीण) – 8308844004

पोलीस प्रशासन जनतेच्या सहकार्याने या अमानुष घटनेतील आरोपी लवकरात लवकर गजाआड करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow