पुणेकरांनो सावधान ! दिवसा ढवळ्या तुमचीही होऊ शकते मोठी फसवणूक ; वाचा काय आहे प्रकरण

आय मिरर
तु्म्हीही पुण्यातून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण पुण्यातून प्रवास करताना तुमच्यासोबतही हे घडू शकतं.भर दिवसा काही लोक येतील आणि तुमची फसवणूक करुन निघून जातील..आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नक्की प्रकरण काय?
तर झालं असं की पुण्यात मोठ्या प्रमाणात टायर पंक्चर घोटाळा होत आहे. यामध्ये आता आणखी एका प्रकरणाची भर पडली असून, सोमवारी एका व्यक्तीने त्याच्या कारच्या डॅश कॅमेऱ्यात एका घोटाळ्याबाजाला कैद केले. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तु्म्हालाही धक्का बसेल.
त्या व्यक्तीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, कार चालवत असताना, दोन पुरुष त्याचा पाठलाग करत होते आणि त्याला टायरमध्ये कमी हवा असल्याचे सांगित आहेत.
मात्र, त्याच्या कारमध्ये इनबिल्ट टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) होते ज्यामुळे घोटाळेबाजांचा खोटारडेपणा उघड झाला. त्या माणसाने पंक्चर घोटाळ्याचा आणखी एक प्रयत्न" या विषयासह व्हिडिओ अपलोड केला आणि लिहिले, "आज नगर रोडवर, शास्त्री चौकातील एका टायर शॉपच्या अगदी आधी, कोणीतरी माझ्या टायर प्रेशरला कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले.
यावेळी माझ्या कारच्या टीपीएमएसमुळे मला लगेच कळले की हा एक घोटाळा आहे.माझ्या एका सहप्रवाशाने असेही सांगितले की तिच्या स्कूटीवर तिचीही अशीच फसवणूक झाली. तुम्ही पाहू शकता की त्यांनी ब्लूग्रास टेक पार्कपासून सुरुवात केली आणि आधी दुसऱ्या एका कारवाल्याला सांगितलं आणि नंतर माझ्याकडे आले. नंतर ते ट्रॅफिकमध्ये पुढे गेले. सर्वांनी सुरक्षित रहा आणि या पंक्चर घोटाळ्यापासून स्वतःला वाचवा."
ते तुमची फसवणूक कशी करतात ?
या घोटाळ्यांमध्ये, फसवणूक करणारे प्रथम तुम्हाला खात्री पटवून देतात की तुमचा टायर पंक्चर आहे किंवा टायरमधली हवा कमी झाली आहे. नंतर तुम्हाला जवळच्या पंक्चर दुरुस्ती दुकानात घेऊन जातात. तेथे, दुरुस्ती करणारा जाणूनबुजून टायरमध्ये अनेक छिद्रे पाडतो आणि प्रत्येक पंक्चरसाठी १००-१५० रुपये आकारतो. २० पर्यंत पंक्चर होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागते. इतर टायर पंक्चर घोटाळ्याच्या प्रकरणांमध्ये, पंक्चर बनवणाऱ्यांना जवळच्या रस्त्यावर खिळे फेकल्याबद्दलही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांनो अशा स्कॅमपासून सावध राहा.
What's Your Reaction?






