भिगवण परिसरातील मराठा महासंघाच्या 25 शाखांचे 28 ऑक्टोंबर रोजी होणार उद्घाटन

Oct 26, 2023 - 11:22
 0  799
भिगवण परिसरातील मराठा महासंघाच्या 25 शाखांचे 28 ऑक्टोंबर रोजी होणार उद्घाटन

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)

मराठा महासंघ ही संघटनाच मूळतः बलिदानातून निर्माण झालेली असल्यामुळे संघटनेला महाराष्ट्रामध्ये चांगले स्थान आहे.सध्याही महाराष्ट्रात संपूर्ण मराठा समाज एकत्र आलेला आहे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड.पांडुरंग जगताप यांनी गाव तिथे मराठा महासंघाची शाखा असे आव्हान केलेले असल्यामुळे प्रथम टप्पा म्हणून भिगवण परिसरातील 25 मराठा महासंघाच्या शाखांचे उद्घाटन मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, संयुक्त सरचिटणीस गुलाब गायकवाड, राष्ट्रीय युवक अध्यक्ष अतिश गायकवाड,राष्ट्रीय युवक प्रतिनिधी किशोर गिराम पाटील यांच्या शुभहस्ते दि.28 आँक्टोंबर 2023 रोजी होणार आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघ ही महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यासाठी काम करणारी सर्वात जुनी संघटना असून संघटनेमार्फत मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडून सनदशीर मार्गाने न्याय मिळवून घेतलेला आहे.त्यासाठी संघटना रस्त्यावरील तसेच न्यायालयीन लढाई वेळोवेळी देत आलेले आहे. 

सकाळी नऊ वाजता खडकी तालुका दौंड येथे प्रथम शाखा उद्घाटन होऊन तेथून संपूर्ण भिगवण परिसरामध्ये मोटार सायकल रॅली व चार चाकी गाड्यातून रॅली काढून पुढे स्वामी चिंचोली, गुणवरे वस्ती ,भिगवन वॉर्ड नंबर चार तीन दोन एक तक्रारवाडी मदनवाडी भादलवाडी डाळज नंबर एक दोन व तीन,पिंपळे व शेटफळगडे येथे शाखा उद्घाटन करण्यात येणार आहे. 

दुपारी शेटफळगडे येथे जाहीर सभा होणार असून सायंकाळी पाच वाजता हॉटेल ज्योती स्वामी चिंचोली येथे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत.

सदर पत्रकार परिषदेमध्ये मराठा महासंघाची वाटचाल ,मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या मागण्याबाबत आणि मराठा महासंघाने बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी भादलवाडी या कंपनीत उभारलेले आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करणार आहेत. दुसऱ्या टप्प्यांमध्ये भिगवण स्टेशनन वार्ड नंबर पाच,वार्ड नंबर सहा डिकसळ खानोटे व राजेगाव येथे शाखा उद्घाटन करून संध्याकाळी राजेगाव येथे जाहीर सभा होणार आहे.

सदर पूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमांमध्ये मोटर सायकल रॅली काढून भव्यशक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड.पांडुरंग जगताप,जिल्हा सरचिटणीस विक्रम पवार,इंदापूर तालुकाध्यक्ष राजकुमार मस्कर ,युवक अध्यक्ष तुषार चव्हाण,दौंड तालुकाध्यक्ष दादासाहेब नांदखिले,युवकाध्यक्ष विकास जगदाळे, महिला तालुकाध्यक्ष डाॅ.पद्मा खरड भिगवण, शाखाध्यक्ष छगन वाळके,भिगवण शहराध्यक्ष प्रशांत गायकवाड, भिगवण शहर महिलाध्यक्षा सौ सुचिता साळुंखे यांनी दिली. तरी सदर कार्यक्रमांमध्ये सर्वांनी भाग घेऊन मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow