जय भवानीगड पतसंस्था लाखेवाडी परिसरातील व्यवसायिकांसह शेतकऱ्यांचा आधार ठरेल - चित्रलेखा ढोले

Oct 26, 2023 - 06:34
 0  673
जय भवानीगड पतसंस्था लाखेवाडी परिसरातील व्यवसायिकांसह शेतकऱ्यांचा आधार ठरेल - चित्रलेखा ढोले

आय मिरर

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरच्या लाखेवाडी गावचा सर्वांगीण विकास झपाट्याने सुरु असून गावातील लहान मोठ्या व्यवसायिक,सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना, आर्थिक आधार देण्याची भूमिका जय भवानीगड ग्रामीण बिगर शेती पतसंस्था अत्यंत प्रभावीपणे बजावणार आहे. त्यामुळे ही पतसंस्था भविष्यात लाखेवाडी परिसराला वरदान ठरेल असा विश्वास लाखेवाडीच्या सरपंच चित्रलेखा ढोले यांनी व्यक्त केला. 

लाखेवाडीच्या सरपंच चित्रलेखा ढोले यांच्या हस्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दि. २४ आँक्टोंबर रोजी दस-याच्या मुहूर्तावर जय भवानी गड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे लाखेवाडी येथे उद्घाटन पार पडले. यावेळी तगया बोलत होत्या.

यावेळी पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन बबन सानप, संचालक कांतीलाल निंबाळकर, पौर्णिमा खाडे, अनिल माने, चंद्रकांत ढोले, मधुकर खाडे, अनिल कदम, अमोल थोरवे, जांबुवंत ढोले, संतोष कुंभार, सोमनाथ गायकवाड, पतसंस्थेचे सचिव लक्ष्मण खाडे, संस्थेचे हेड क्लार्क प्रल्हाद ढोले, तसेच मनोज खाडे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ढोले म्हणाल्या की,लाखेवाडी गाव रहदारीच्या रस्त्यालगत आहे. त्यामुळे गावात लहान मोठे व्यवसायिकांची संख्या वाढत चालली आहे. शेतीबरोबर दुग्ध उतदपादन, कुक्कुटपालन असे पूरक व्यवसाय येथील इथला शेतकरी करर असतो.यातून मिळणा-या आर्थिक उत्पन्नातून आओल्या गरजा भागवून काही रक्कम तो आपल्या हक्काच्या ठेवी म्हणून, या पतसंस्थेत ठेवू शकतो.जेव्हा आर्थिक अडचणीचा काळ येईल तेव्हा ही पतसंस्था त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. असा विश्वासही चित्रलेखा ढोले यांनी ठेवीदारांसह सभासदांना दिला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow