मयूर पतसंस्थेच्या चेअरमनपदी ॲड.पांडुरंग जगताप व व्हाइस चेअरमन पदी सुनील कन्हेरकर पाटील यांची बिनविरोध निवड
आय मिरर
भिगवण येथील मयूर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची सन 2023 ते 2028 या कालावधीची निवडणूक बिनविरोध पार पडली असून शनिवारी दि.२० जानेवारी रोजी पतसंस्थेच्या कार्यालयात सहाय्यक निबंधक जे.पी.गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नूतन संचालकांच्या सभेत चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी करण्यात आल्यात.
संस्थेचे चेअरमन म्हणून ॲड पांडुरंग जगताप व व्हॉइसचेअरमन पदी सुनील कन्हेरकर पाटील या दोघांचे एकमेव अर्ज आल्यामुळे जे पी गावडे यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली आहे.
संस्थेचे संचालक म्हणून संस्थापक प्रकाश ढवळे, शंकरराव गायकवाड ,विकास वाघ ,प्रदीप बोरा, संजय खाडे, श्रीमती नलिनी कदम यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली.तर नवीन संचालक म्हणून युवराज विधाते, राजेंद्र वाघ ,नंदकुमार धांडे, संजय सवाने व सौ साधना काळे यांची नूतन संचालक म्हणून बिनविरोध निवड करणेत आली. सदर निवडी वेळी संस्थेचे संस्थापक प्रकाश बापू ढवळे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे सत्कार करून भावी वाटचाली साठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
सदर वेळी बोलताना संस्थेचे चेअरमन ॲड.पांडुरंग जगताप यांनी सांगितले की संस्थेचे सध्या रौप्य महोत्सवी वर्ष चालू असून संस्थेची वाटचाल चांगल्या प्रकारे करण्यासाठी संस्थेच्या संचालक तसेच सभासदांना विश्वासात घेऊन पारदर्शक कारभार करण्यात येईल. यावेळी विकास वाघ, राजेंद्र वाघ यांनी मनोगत व्यक्त केली.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे व्यवस्थापक प्रदीप नांदगुडे यांनी केले तसेच आभार संस्थेचे व्हॉइस चेअरमन सुनील कन्हेरकर पाटील यांनी मानले.
What's Your Reaction?