शॉर्ट सर्किट होऊन कडब्यासह आयशर जळून खाक

Apr 9, 2024 - 13:08
 0  798
शॉर्ट सर्किट होऊन कडब्यासह आयशर जळून खाक

आय मिरर

कडब्याची वाहतूक करताना आयशर वाहनाचा विद्युत तारेला झालेल्या घर्षणामुळे शॉर्ट सर्किट होऊन कडब्यासह आयशर जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (ता.०८) संध्याकाळी सहाच्या जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथे घडली.

प्राप्त माहितीनुसार, जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथून आयशर वाहन (क्र. MH 07 C 5329) कडबा भरून जोगवाडा गावातून जात असताना लोंबकळणाऱ्या तारेला धक्का लागल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन वाहनातील कडब्याने पेट घेतला. भरवस्तीत कडब्याने पेट घेतल्यामुळे मोठे नुकसान होईल म्हणून चालकाने प्रसंगावधान राखत आयशर वाहनाला गावाच्या बाहेर नेऊन उभे केले यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान,गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आली नसल्याने वाहनासह कडबा जळून खाक झाला. एव्हाना घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पथकाने हजर होऊन आग आटोक्यात आणली. तोपर्यंत कडब्यासह आयशर पूर्णतः जळून खाक झाले. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow