इंदापूरच्या बाह्य वळणावर टमटमला लागली अचानक आग ! आगीत देशी गाय गंभीर भाजली

आय मिरर
इंदापूर बाह्यवळणावर सरडेवाडी गावाच्या हद्दीत चार चाकी टमटमला अचानक आग लागली.या टमटम मध्ये इंदापूर बाजार समिती मधील कृषी महोत्सवातील पशु प्रदर्शनासाठी सरडेवाडी येथील पांडुरंग मोटे आपल्या देशी गाईला घेऊन येत होते.या आगीत मोटे यांची गाय गंभीर रित्या भाजली गेलीय.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 22 ते 26 जानेवारी दरम्यान कृषी महोत्सव साजरा केला जातोय,यानिमित्ताने पशु प्रदर्शनाच आयोजन करण्यात आल आहे. यासाठी इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील पांडुरंग मोटे हे त्यांच्याकडील असणारी देशी गाय घेऊन इंदापूर कडे येत होते.याच दरम्यान इंदापूरच्या बाह्य वळणावर सरडेवाडी गावच्या हद्दीत अचानक टमटमला आग लागली.
विशाल गायकवाड केशव गायकवाड व इतर स्थानिकांनी ही घटना पाहिली आणि टमटम चालकाला या संदर्भात कल्पना दिली.यानंतर वाहन थांबवण्यात आलं आणि या आगीतून गाईला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. या वाहनात गाय जास्त हालचाल करत होत आणि त्यामुळे पाचट गरम इंजिनला चिटकून वाहनाने पेट घेतला असावा असा प्राथमिक अंदाज लावला जातोय.
What's Your Reaction?






