धक्कादायक ! बारामतीत शाळकरी विद्यार्थ्याला डंपरने चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू तर एक जण सुदैवाने बचावला

आय मिरर
तांदूळवाडी बारामती रोडवर एका चार चाकी हायवा डंपर ने एका विद्यार्थ्याला चिरडलं आहे. या अपघातात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय.जुनेद झारी असं मयत विद्यार्थ्याचं नाव असून तो बारामती तालुक्यातील तांदूळवाडी गावचा असल्याची माहिती मिळत आहे.
तो बारामती मधील टीसी कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गात शिकत होता.तांदुळवाडी बारामती मार्गावर रेल्वे गेट बोगद्या शेजारच्या वळणावर हा अपघात झालाय.
मिळालेल्या माहितीनुसार,बारामती मधील टी सी कॉलेज मधील पेपर संपल्यानंतर जुनेद झारी आपला मित्र तुषार सोबत एका दुचाकीवरून घरी निघाला होता. जुनेद स्वतः दुचाकी चालवत होता तर मित्र तुषार पाठीमागे बसला होता.
यावेळी दुचाकी वरून दोघे निघालेले असताना अचानक पुढून आलेल्या हायवा चालकाने आपली गाडी वळवली आणि यात दुचाकी वरील दोघेही जमिनीवर कोसळले. यावेळी डंपरचे पुढील चाक झारी याच्या अंगावरून गेल्याचे व्हिडीओत दिसत आहे.तर सोबत असणारा तुषार बचावला आहे.
What's Your Reaction?






