भिगवण जवळील बिल्ट ग्राफिक्स विरोधात अखिल भारतीय मराठा महासंघाचा आंदोलनाचा इशारा - जिल्हाध्यक्ष जगताप यांची माहिती

Sep 20, 2023 - 21:05
 0  851
भिगवण जवळील बिल्ट ग्राफिक्स विरोधात अखिल भारतीय मराठा महासंघाचा आंदोलनाचा इशारा - जिल्हाध्यक्ष जगताप यांची माहिती

आय मिरर

भिगवण परिसरातील सर्वात मोठी औद्योगिक कंपनी म्हणून बिल्ट ग्राफिक्स पेपर कंपनी भादलवाडी ही कंपनी ओळखली जात असून या कंपनीमध्ये मात्र माथाडी कामगारांवर अन्याय होत आहे सदर कंपनीने ज्या पद्धतीने स्थानिक बेरोजगार कुशल कामगारांना काम उपलब्ध करून देणे गरजेचे होते परंतु त्यांना काम न देता कंपनीमध्ये फार मोठ्या प्रमाणात बाहेरील कामगार भरती करून कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार होऊन मर्जीतील कामगार लोकांना कामावर घेतले जात आहे.त्यामुळे अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग जगताप यांनी दिली.

जगताप म्हणाले की,सदर कंपनीच्या विविध भागांमध्ये 45 पेक्षा जास्त माथाडी कामगार यांची गरज असून सध्या तेथे कंत्राटी कामगार काम करीत आहेत परंतु कंपनी जाणून-बुजून माथाडी कामगारांची भरती करत नाही तसेच कंपनीमध्ये गेले वीस वर्षापासून अनेक कामगार कंत्राटी कामगार म्हणून काम करत असून त्यांच्याकडून कंपनी कुशल कामगारांचे काम करून घेऊन त्यांना अकुशल कामगारांचे वेतन देत आहे यामध्ये फार मोठा सावळा गोंधळ कंपनीचा चालू आहे.त्यामुळे समान काम समान वेतन या तत्वानुसार अकुशल कामगारांना पगार देण्यात यावा.

तसेच सदर भागांमध्ये कंपनी असून सदर भागातील सर्व सोयी सुविधा कंपनी वापरत असताना स्थानिक लोकांना प्राधान्याने कंपनीमध्ये कामाला घेणे आवश्यक असताना याकडे कंपनी जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहे. तसेच 

कंपनीमध्ये 2011 मध्ये माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत मा.सहाय्यक कामगार आयुक्त पूणे यांच्या आदेशाने दिनांक 11 /11/ 2011 रोजी बिल्ट कंपनीला लेखी आदेश देऊन माथाडी कामगार म्हणून 14 कामगारांची प्रतीक्षा यादी ठेवण्यात आलेली आहे तसेच पूर्वीच्या असलेल्या माथाडी कामगारांनी राजीनामा दिल्यास किंवा त्यांच्यापैकी कोणाचीही नोंदणी संपुष्टात आल्यास किंवा कामांमध्ये वाढ झाल्यात प्रतीक्षा यादीतील कामगारांची यादीतील क्रमांनुसार प्राधान्याने मंडळात नोंदणी करून नियुक्ती करण्यात येईल.असे लेखी दिलेले असताना सदर आदेशाला केराची टोपली दाखवली आहे आणि नवीन बेकायदेशिर माथाडी भरती माथाडी बोर्डातील अधिकारी यांना हाताला धरून केलेलीं आहे सदर बाबत कंपनीने तात्काळ प्रतीक्षा यादीतील सर्व कामगारांना माथाडी कामगार समाविष्ट करण्यात यावे.

तसेच बिल्ट कंपनीमध्ये अनेक कायद्यांची पायमल्ली होत असताना त्यांच्याकडे प्रशासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच कंपनीतील माथाडी कामगार व कंत्राटी कामगार आणि स्थानिक लोकांना न्याय देण्यासाठी कंपनीने पंधरा दिवसांमध्ये योग्य तो अहवाल संघटनेला सादर करून संघटनेच्या मागण्यांचा सारासार विचार करून संबंधितांना न्याय द्यावा अन्यथा पंधरा दिवसानंतर भिगवन परिसरामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच परिसरातील सर्व सामाजिक आणि राजकीय संघटनांना सोबत घेऊन मोठे जन आंदोलन पुकारले जाईल याची नोंद घ्यावी. 

या संदर्भातील निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बिल्ट पेपर कंपनी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,कामगार मंत्री,उद्योग मंत्री, मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकारी,कामगार आयुक्त व माथाडी मंडळ यांना दिलेले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow