दौंड मध्ये भयानक घडलं, देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून लुटलं ! अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला

आय मिरर
पुण्याच्या दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे.पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील स्वामी चिंचोली हद्दीत पुण्याहून सोलापूरकडे जाणारे एक खाजगी वाहन चहा पिण्यासाठी एका टपरीवर थांबलं होतं.
याच वेळेस दोन युवक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांच्या अंगावरील सोन्याची दागिने काढून घेतले यासोबतच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आज सोमवारी 30 जून रोजी पहाटे चर्चासुमारास घडले आहे. या नंतर घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार पोलीस पथकाने भेट दिली असून या घटने संदर्भात दौंड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नेमकं काय घडलं ?
आपल्या खाजगी वाहनाने एक कुटुंब देवदर्शनासाठी सोलापूरच्या दिशेने निघाले होते. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथून पुढे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर पहाटे चर्चासुमारास चहा घेण्यासाठी हे कुटुंब थांबलं.
त्यानंतर गाडीत बसताना दोन जण गाडीवरून आले आणि त्यांना अडवलं. दोन जणांनी कोयता गळ्याला लावला आणि त्यांना लुटलं. त्यानंतर या आरोपींनी अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचाही आरोप आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
लाखो वारकरी सध्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. 'माऊली-माऊली'चा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी हा सोहळा पंढरपूरच्या दिशेने निघाले आहे. तर काहीजण वारीत सहभागी न होता पंढरीचा देवदर्शनासाठी ही जात आहेत. अशातच एक कुटुंब देवदर्शनासाठी जात असताना त्यांच्यासोबत दौंड मधील स्वामी चिंचोली परिसरात घृणास्पद प्रकार घडला. गळ्याला कोयता लावून त्यांच्याकडील ऐवज रोखण्यात आला शिवाय एका अल्पवयीन मुलीवर ही अत्याचार केल्याचा आरोप होत असल्याने सर्व स्तरातून या घटनेबद्दल संताप व्यक्त होत आहे.
What's Your Reaction?






