जगदाळे समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट ! इंदापूरात राजकीय चर्चेला उधाण

Sep 11, 2024 - 12:36
Sep 11, 2024 - 12:54
 0  778
जगदाळे समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट ! इंदापूरात राजकीय चर्चेला उधाण

आय मिरर

इंदापूर विधानसभेतून शरद पवार गटाकडून पिडीसीसी बँकेचे संचालक आणि बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळेंच नांव चर्चेत आहे.जगदाळे समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतल्याने या चर्चेला अधिक उधाण आलेय.

इंदापूरच्या शहरातील आणि सणसर लासुर्णे जिल्हा परिषद गटातील गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पवारांची भेट घेतली आहे. आज सकाळी कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा,रामकृष्ण मोरे,प्रमोद राऊत,निवास माने,आरशद सय्यद,बापूसाहेब जामदार आदींनी शरद पवार यांची भेट घेतली तर काल सायंकाळी इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास माने, संचालक अमोल भोईटे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.त्यांनी खा.सुळे यांची ही भेट घेतल्याने इंदापुरात राजकीय चर्चांना उधान आले आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप सध्या झाले नाही. इंदापूर विधानसभेतून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे पुन्हा मैदानात असतील याचे संकेत मागेच जन सन्मान यात्रेत अजित पवारांनी दिले आहेत. तर हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.मात्र अद्याप आपण भाजपमध्येच असल्याची प्रतिक्रीया पाटील यांनी दिली आहे.युतीच्या जागा वाटपात इंदापूरवर कोणाचा शिक्कामोर्तब होणार यावर पाटील आपली पुढील दिशा स्पष्ट करतील असा अंदाज लावला जातोय. एक तर ते अपक्ष उभा राहून आ.भरणेंना शह देतील किंवा थेट शरद पवारांसोबत जावून मैदानात उतरतील.मात्र यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

विधानसभेला चालणार पवारांचा पॅटर्न ?

लोकसभेच्या निवडणूकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. चारशे पार चा नारा देणारी भाजपा अर्ध्यावर आली अन् त्याला कारण ठरले शरद पवार ! अजित पवारांना घर घरच्या मैदानात हार मानावी लागली.महाविकास आघाडीला राज्यातील जनतेने जनाधार दिल्यानंतर त्याच वेळी मला चार महिन्यात महाराष्ट्राचं सरकार बदलायचेय असा इशाराच शरद पवारांनी इंदापूरच्या निरवांगी मधील दुष्काळ पाहणी दौ-यातून दिला.तेव्हापासून राज्यात महाविकास आघाडीने उचल खाल्ली आहे.भाजपामध्ये असणा-यांना ही आता उद्याच्या निवडणूकीत विजयाची खात्री वाटत नसून सध्या पक्ष बदलाचे वारे ही वाहु लागले आहेत.समजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशानंतर पवारांनी अनेकांचे फोन येत आहेत.एकेकाचा पक्ष प्रवेश करुन घेतला जाईल म्हणत भाकरी फिरवण्याचे संकेत दिलेत.त्यामुळे उद्याच्या निवडणूकीत पवारांचा पॅटर्न अधिक चालु शकतो अशी चर्चा आहे.

तर इंदापुरात शरद पवारांची भुमिका ठरणार महत्वाची

इंदापूर विधानसभेसाठी शरद पवारांची भुमिका महत्वाची ठरणार आहे. लोकसभेच्या निवडणूकांपासून इंदापूरचे अजित पवार गटाचे आ.भरणे पवारांच्या रडारवर आहेत. ०५ मे च्या इंदापूरच्या सभेतून अरे मामा जरा जपून, लक्षात ठेवा, सरळ करायला वेळ लागणार नाही असा थेट इशाराचं भरणेंना दिला आहे. तेव्हा पासून शरद पवार इंदापुर च्या राजकीय हालचालींवर पवार बारीक लक्ष ठेऊन आहेत.मध्यंतरी शरद पवार आणि भाजपाचे नेते भरणेंचे प्रतिस्पर्धी हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यात राजकीय खलबतं घडल्याचं बोललं जातयं.त्यामुळे भरणेंना पाडण्यासाठी पवार मोठा डाव खेळण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

लोकसभेला जळदाळेंचा प्रवेश ठरला फलदायी

दोन मोठ्या साखर कारखान्याचे उपाध्यक्ष,बाजार समितीचे सभापती,काही संचालक,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आणि हजारो कार्यकर्त्यांची फौज घेऊन पिडीसीसी बँकेचे संचालक आणि मा.सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी पवार गटात प्रवेश केला.2019 च्या निवडणूकीत केवळ भरणेंना विरोध म्हणू जगदाळे गट राष्ट्रवादीपासून बाजूला झाला होता. यंदाच्या लोकसभेत जगदाळे गटाने तालुक्यात ताकद लावली. जुन्या नव्या पवारांच्या कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले आणि सुळेंना 26 हजारहून अधिकचंताधिक्य दिले.यात जगदाळेंनी महत्वाची भुमिका बजावली. 

इंदापूर विधानसभेतून आप्पासाहेब जगदाळे प्रमुख दावेदार

लोकसभेच्या निवडणूकीवेळी विरोधात असणारे मात्र नुकतेच पवार गटात प्रवेश केलेले प्रवीण माने ही पवार गटाकडून दावेदार असले तरी सध्या आप्पासाहेब जगदाळे हेच शरद पवार गटातून प्रमुख दावेदार आणि वजनदार नेते मानले जातात.आप्पासाहेब जगदाळे यांनी इंदापूरची विधानसभा लढवावी आणि पवारांनी त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणीही आता जोर धरु लागलीय. त्यामुळे पवार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow