बारामतीत महायुतीत राडा ! शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरेंनी अजित पवारांच्या फोटोवर काळ कापड झाकलं,पोलिसांनी जेवरेंना घेतलं ताब्यात
आय मिरर
बारामतीत महायुतीचा संघर्ष पाहायला मिळाला आहे.शिवसेनेच्या वतीने एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाच्या कमानी बारामती शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. बारामती शिवसेनेच्या वतीने एकनाथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले परंतु याच्या उद्घाटनाला अजित पवार न आल्याने शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटो वरती काळ कापड टाकल्याने पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतले आहे.
यावेळी पोलीस आणि सुरेंद्र जेवरे यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली. सुरेंद्र जेवरे हे शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. अजित पवारांना तीन ते चार वेळा कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली परंतु अजित पवारांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवली.अजित पवारांच्या कुटुंबाला देखील बोलावलं होतं परंतु अजित पवारांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणपती मंडळांना भेटी दिल्या तरी अजित पवार एकनाथ फेस्टिवलला आले नसल्याने अजित पवारांच्या फोटो काळ कापड टाकलं.अजित पवारांचा निषेध केला त्यानंतर पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतले.
What's Your Reaction?