निवडणुकीआधीच बारामतीत हायव्होल्टेज ड्रामा ! सुप्रिया सुळेंचा बॅनर फाडला
आय मिरर
लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. अशात इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यंदा बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.एकीकडे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार संभाव्य उमेदवार मानल्या जात आहेत. त्यामुळे दोन्ही गटासाठी ही निवडणूक म्हणजे अटीतटीची लढाई बनली आहे. दोन्ही बाजूने प्रचाराला सुरुवात झाली आहे. पण, निवडणुकीपूर्वीच हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. त्याला कारण ठरलंय बारामती मतदार संघात लावलेले खासदार सुप्रिया सुळे यांचे बॅनर. हे बॅनर अज्ञातांनी फाडल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांचे बॅनर फाडले
खासदार सुप्रिया सुळे यांचे फ्लेक्स फाडण्यात आल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भोर उत्रौली गावात ही घटना घडली आहे. सुप्रिया सुळे यांची उमेदवारी आणि तुतारी चिन्हासह असलेला फ्लेक्सवर ब्लेड मारून फडण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे जिथे सुनेत्रा पवार यांचा कार्यक्रम होणार होता, त्याच ठिकाणचा फ्लेक्स फाडला गेला आहे. उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्याच्या भागावर फुली मारून फ्लेक्स फडण्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर उत्रौली गावत फ्लेक्स लावण्यात आले होते. फाडलेले फ्लेक्स तात्काळ काढण्यात आले आहेत.
सुळेंसाठी अजित पवारांचा पुतण्या मैदानात
बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशीच लढत होणार असल्याचे निश्चत मानले जात आहे. तर दुसरीकडे मतदार संघात दोन्ही बाजूंनी प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. अशात अजित पवार यांच्याविरोधात त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार मैदानात उतरल्याचे दिसत आहे. युगेंद्र पवार यांनी बारामती मतदार संघातील गावांना भेटी वाढवल्या आहेत. त्यांनी मी शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. गावभेटीवेळी युगेंद्र पवार म्हणाले, "बारामतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून काम करत आहे. मला वाटतं आता शदर पवार यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, आज बारामतीला ओळख ही शरद पवार यांच्यामुळे मिळाली आहे. आपण बाहेर गेल्यानंतर बारामतीचा आहे म्हटल्यावर लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतात, त्यामुळे आता आपल्याला शरद पवार यांना पाठिंबा देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
What's Your Reaction?