मद्यधुंद ट्रक चालकाचा थरार,माळेगाव - कऱ्हावाघज रोडवर पहा काय घडलं

Jun 7, 2026 - 09:14
Jun 7, 2026 - 09:18
 0  307
मद्यधुंद ट्रक चालकाचा थरार,माळेगाव - कऱ्हावाघज रोडवर पहा काय घडलं

आय मिरर 

बातमी आहे पुण्याच्या बारामतीतून, बारामती तालुक्यातील माळेगाव - कऱ्हावाघज रोडवर एका मद्यधुंद ट्रक चालकाचा हैदोस पहायला मिळालाय.दारूच्या नशेत गाडी चालवल्याने ट्रक पलटी झाला असून मध्य धुंद ट्रक चालकासोबत आणखी एक व्यक्ती होती.या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

दारूच्या नशेत बेभान झालेला हा ट्रक चालक ज्या पद्धतीने वाहतुकीच्या रस्त्यावर ड्रायव्हिंग करीत होता ते पाहून तुमच्या ही जीवाचा थरकापच उडेल.सुदैवाने समोरून येणाऱ्या गाड्या या अपघातातून वाचल्या आहेत आणि मोठा अनर्थ टळला गेलाय.

व्हिडिओ मध्ये पाहिल्यानंतर प्रथम असे दिसून येत आहे की माल वाहतूक करणार एक ट्रक चालक बेफिकरपणे चालवत आहे. त्यानंतर पाठीमागे चालणाऱ्या वाहन चालकांच्या लक्षात येते की त्याने नशा केली आहे आणि मग पाठीमागील वाहन चालक सावध होतात. त्यातीलच एका वाहन चालकाने त्याचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. 

नशेमध्ये नागमोडी वळण घेत तो रस्त्याने बेफिकीरपणे त्याच्याच नादात वाहन चालवत असताना व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसून येत आहे.काही अंतर पार केल्यानंतर मात्र रस्त्याच्या मधोमध हा ट्रक एकाएकी अपघात होऊन पलटी झाला. मिळालेल्या माहितीनुसार त्यामध्ये त्या मद्यधुंद चालकासोबत आणखी एक व्यक्ती होती. 

दरम्यान समोरून येणाऱ्या वाहन चालकांचा जीव मात्र यावेळी टांगणीला लागला होता. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.दैव बलवत्तर म्हणून समोरून येणारे वाहन चालक या मद्यधुंद ट्रक चालकाच्या या जीवघेण्या थरारातून वाचले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow