नव्याने काम सुरु असलेल्या दौंडमधील भीमा नदीवरील पूलाचे खांब कोसळले
आय मिरर
दौंड तालुक्यात नव्याने सुरु असलेल्या भीमा नदीवरील पुलाचे खांब कोसळले आहेत. दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचे काम चालू होते. या पुलाचे खांब कोसळले आहेत.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या दौंड गार गावादरम्यान पुलाचं काम सुरू होतं. 21 कोटी रुपये खर्चून हे काम करण्यात येत होतं मात्र पूल उभारण्याचं काम सुरू असताना पुलाचे खांब कोसळले आहेत.
नव्याने होत असलेल्या भीमा नदीवरील पुलाचे खांब कोसळले असून कोणतीही जीवितहानी नाही.पुलाचे काम निष्कृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप होत होते.दौंड बांधकाम विभागाकडे या कामाबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या.मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून पुलाचं काम सुरूच ठेवलं अखेर आज या पुलाचे खांब कोसळले आहेत.
दौंड येथील भीमा नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गार आणि दौंड आणि गार या दोन गावांना जोडणारा या पुलाचे काम सुरू असून उन्हाळ्यात भीमा नदी ही पूर्ण कोरडी होती परंतु गेल्या तीन-चार दिवसापासून राज्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला आहे व धरणातून देखील थोडेफार पाणी नदीला सोडण्यात आले आहे.
काल दि ९ रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे या कामावरील पिलर चा एक भाग कोसळला त्यामुळे या कामाची पात्रता काय किती निकृष्ट दर्जाचे काम आहे हे यावरून सिद्ध होते.जर काम सुरू असते तर आणि हा असा प्रकार घडला असता तर नक्कीच कोणाला तरी आपला जीव गमवावा लागला असता.
What's Your Reaction?