ड्युटीवर आले अन् छातीत दुःखू लागलं, एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन

Sep 21, 2026 - 18:23
Sep 21, 2026 - 18:25
 0  516
ड्युटीवर आले अन् छातीत दुःखू लागलं, एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन

आय मिरर 

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय सांगडे यांचे कर्तव्यावर असताना निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. सोमवारी सकाळी ते ड्युटीवर आल्यानंतर ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात त्यांना अचानक छातीत दुःखू लागलं व नंतर चक्कर आली.

त्यांनतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक म्हणून कल्याण नियंत्रण कक्षात कार्यरत असणारे सांगडे मागील तीन वर्षांपासून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकात कार्यरत होते. ते डोंबिवलीच्या पलावा सिटीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होते. मनमिळावू असलेल्या सांगडे यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

विजय सांगडे हे पुण्यातील जुन्नरचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या अकाली मृत्युनंतर त्यांच्यावर त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले जात असून त्यांचे पार्थिव मुळगावी नेण्यात येणार आहे.

पार्थिव गावी नेण्याआधी दिवंगत पोलीस उपनिरीक्षक विजय सागंडे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय परिसरात ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून मानवंदना आणि श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ -१ बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ -५ प्रशांत कदम सह इतर वरिष्ठ पोलीस उपस्थित होते.अत्यंत मनमेळावू असलेल्या सांगडे यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर त्यांच्या सहकार्यांना अश्रू अनावर झाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow