नगरच्या भिंगार उपनगरामध्ये गणेश मिरवणुकीत पोलिसांचा लाठीचार्ज ? मंडळाच्या अध्यक्षाचा मृत्यू झाल्याचा आरोप

Sep 24, 2026 - 07:34
Sep 24, 2026 - 07:36
 0  360
नगरच्या भिंगार उपनगरामध्ये गणेश मिरवणुकीत पोलिसांचा लाठीचार्ज ? मंडळाच्या अध्यक्षाचा मृत्यू झाल्याचा आरोप

आय मिरर 

नगरच्या भिंगार उपनगरामध्ये गणेश मिरवणुकीत पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचा आरोप केला जातोय.यातून गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा मृत्यू झाल्याचा ही आरोप आहे.पोलिसांच्या लाठीचार्जमुळेच वाघस्कर यांचा मृत्यू झाल्याचा आमदार संग्राम जगतापांचा आरोप आहे.

लाठीचार्जदरम्यान शुक्लेश्वर तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्ष दीपक वाघस्कर यांचा मृत्यू झाला असून रात्री १० वाजेपर्यंत विसर्जन मिरवणुकीला परवानगी असतांना रात्री साडेनऊच्या सुमारास पोलिसांनी अचानक लाठीचार्ज केल्याचा जगतापांसह मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

वाघस्कर यांना दाखल केलेल्या रुग्णालयाबाहेर आमदार जगतापांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करत संबंधित पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.गुन्हा दाखल होईपर्यंत भिंगार बंद ठेवून गणेश विसर्जन देखील होणार नसल्याची भूमिका आमदार जगतापांसह कार्यकर्त्यांनी घेतली आहे. 

तर गुन्हा दाखल न झाल्यास शुक्रवारी होणारे अहिल्यानगर शहरातील गणेश विसर्जनही रोखण्याची आमदार जगतापांची भूमिका आहे.दीपक वाघस्कर यांचा मृत्यू लाठीचार्जमुळेच झाला की अन्य कारणाने? प्रश्न कायम असून डॉक्टरांकडून अद्याप अधिकृत भूमिका समोर नाही तर पोलीस प्रशासनाकडूनही घटनेबाबत सविस्तर अधिकृत भूमिका अद्याप पोस्ट झालेली नाही.

आमदार जगतापांच्या आरोपांनंतर पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांच्या चौकशीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow