मोठी बातमी | पुरंदरच्या पिसे गावात वीज कोसळून सहा बकऱ्यांचा मृत्यू

Sep 22, 2026 - 19:33
Sep 22, 2026 - 19:55
 0  162
मोठी बातमी | पुरंदरच्या पिसे गावात वीज कोसळून सहा बकऱ्यांचा मृत्यू

आय मिरर 

पुरंदर तालुक्यातील पिसे गावात वीज कोसळून सहा बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास हलका पाऊस सुरू असताना अचानक जोरदार विजांचा कडकडाट सुरू झाला यावेळी ही दुर्घटना घडली आहे

मोहन दादा मुळीक यांच्या शेतात बकरी चालत असलेल्या म्हातारो सोनबा ठोंबरे यांच्या बकऱ्यांवर ही वीज कोसळल या दुर्घटनेत सहा बकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय. सुदैवाने या घटनेत ठोंबरे यांचा मुलगा बचावला आहे.

शासनाने तातडीने या नुकसानीची दखल घेऊन योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठोंबरे हे मोहन मुळीक यांच्या शेतात त्यांच्या बकऱ्या चारत होते.सायंकाळी पाच च्या सुमारास आकाशात मोठे ढग दाटून आले.दरम्यान विजांचा मोठा गडगडात सुरू झाला.

वादळ वारा आणि पाऊस सुरू असताना अचानक 21 कोसळली. या घटनेत ठोंबरे यांच्या सहा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने या अपघातात त्यांचा मुलगा बचावला आहे. मात्र यामुळे ठोंबरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow