सुपे घाटात एसटीला अपघात ; अपघातात दोन ते तीन शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी
आय मिरर
पाटस कडून सुपेकडे निघालेल्या एसटी बसला सुपेच्या घाटात घाट चढत असताना मौसम तुटल्याने अपघात झालाय. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुपे घाटात हा अपघात झालाय.
सुपे घाट चढत असताना बसचा मोसम तुटला आणि यामुळे एसटी बस मागे रीव्हस गेली आणि त्यामुळे ती पलटी झाली. यामध्ये दोन ते तीन शालेय विद्यार्थ्यांना किरकोळ इजा झाल्याची माहिती मिळत आहे.
एम एच 20 बी एल 3121 क्रमांकाची बारामती डेपोची ही एसटी बस होती आणि ती पाटस कडून सुपेकडे निघाली होती.या बस मध्ये जवळपास 25 ते 30 शालेय विद्यार्थी होते अशी प्राथमिक माहिती मिळत असून यापैकी दोन ते तीन विद्यार्थ्यांना किरकोळ इजा पोहोचली आहे.
घटनेची माहिती मिळताच सुपे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके आणि त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.जखमी विद्यार्थ्यांना चौफुला येथील हर्ष हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दोन ते तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या बस मध्ये जवळपास 25 ते 30 विद्यार्थी होते. जखमीन व्यतिरिक्त इतर सुखरूप असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
What's Your Reaction?