गोकुळ मध्ये सतेज पाटील ठरले वरचढ,समविचारी आघाडीने 13 तर महायुतीने 12 जागा जिंकल्या
आय मिरर
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळवर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीची सत्ता आली आहे. समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा मिळावीत गोकुळ मध्ये बहुमत मिळविले आहे.
गोकुळच्या निवडणुकीत आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक चुरशीची लढत यावेळेला झाली. 25 जागांसाठी 5418 पैकी 5416 मतदान झालं होतं. मतमोजणीदिवशी सायंकाळी साडेसात वाजता राखीव गटातील पाच जागांचा अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. रात्री सव्वाआठ वाजता सर्वसाधारण गटातील 20 जागांचा निकाल जाहीर केला. निकाल जाहीर होत नसल्याने आमदार सतेज पाटील मतमोजणी केंद्रात ठाण मांडून बसलेले. याचवेळी दोन फेरमतमोजणी अर्ज आलेले हे अर्ज ठोस कारण नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळून लावले.. मात्र अखेर निकाल जाहीर झाला.. समविचारी आघाडीने 13 जागांवर विजय मिळवला तर महायुतीला 12 जागा मिळाल्या.
गोकुळची मतमोजणी ही दुपारी चार वाजताच संपली होती, मात्र त्यानंतर महायुतीच्या शौमिका महाडिक यांनी फेरमतदान घेण्याची मागणी केली. पण त्यानंतर झालेल्या मतमोजणीत देखील महाडिक यांना पराभवाला समोर जावे लागले.
त्यानंतर महायुतीचे उमेदवार युवराज पाटील आणि विश्वास पाटील आबाजी यांनी फेर मतमोजणीची मागणी केली, पण निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी सबळ कारण न देता फेर मतमोजणी मागितल्याने दिलेला अर्ज नामंजूर केला, त्यामुळे गोकुळ मध्ये समविचारी आघाडीला १३ आणि महायुतीला पॅनलला १२ जागा मिळाल्या.
या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफांचे पुत्र नावेद मुश्रीफांचा पराभव झालाय. शौमिका महाडिक यांनीही पराभवाला सामोरं जावं लागलं. गोकुळ मध्ये तब्बल ३५ वर्षे सत्ता गाजविणाऱ्या विश्वास पाटील आणि अरुण कुमार डोंगळे यांचा देखील पराभव झाला.
गोकुळ चे राजकारण मुंबईतून करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने मत पेटीतून दाखवून दिले असे समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या कोल्हापूरच्या रांगड्या पाटलाचा विजय...
कोल्हापूरचा सतेज पाटील हा एक रांगडा पाटील आहे. सर्वसामान्यांचा आणि सर्वसामान्यांसाठी झटणारा पाटील आहे. त्यांना जनतेचे हित कळतं. धाडसी नेतृत्व आहे. त्यामुळे कोल्हापूरची जनता केंद्रात ,राज्यात कुणाचही सरकार असलं तरी धाडसी लोकांच्या मागे जाते. हे कोल्हापूर जिल्ह्याने दाखवून दिले. अशा शब्दात गोकुळच्या निकालावर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर मोहिते पाटील यांचा रोख चंद्रकांत पाटलांवर टोला लावण्याचा होता का ? अशीही चर्चा सुरू झाली.
तसेच , कोल्हापूरच्या जनतेने आणि माता अंबाबाईने सतेज पाटील यांच्या माध्यमातून आणि गोकुळच्या रूपाने विजयाची सुरुवात करून दिली आहे. अशाच प्रकारचा गोकुळप्रमाणे विजय पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात देखील महाविकास आघाडीचा होईल. असा दावा यावेळी खासदार मोहिते पाटील यांनी केला. तसेच गोकुळच्या निवडणुकीसाठी डेरी मॅनेजर पासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत सर्व यंत्रणांपर्यंत निवडणूक गेली. तरीही कोल्हापूरच्या जनतेला कौल दिला. हा रांगडा पाटलाचा असल्याचे ते यावेळी म्हणाले.
What's Your Reaction?