माळेगाव पोलिसांनी मेडद येथे पकडला साडेतीन लाखांचा गुटखा,एकाला अटक 

Jul 2, 2026 - 08:12
Jul 2, 2026 - 09:07
 0  178
माळेगाव पोलिसांनी मेडद येथे पकडला साडेतीन लाखांचा गुटखा,एकाला अटक 

आय मिरर 

बारामती तालुक्यातील मेडद गावात माळेगाव पोलिसांनी अवैध गुटखा विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात ३ लाख ५७ हजार ३२१ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला असून रामदास बाळू मोरे याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी रामदास बाळू मोरे याला ताब्यात घेऊन त्याच्या मेडद येथील घराची झडती घेण्यात आली.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करताना ३ लाख ५७ हजार ३२१ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुटखा पुरवठा साखळीतील इतर संबंधितांचा शोध पोलीस घेत आहेत. या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow